Jalna Districtजालना जिल्हा

चांगल्या आठवणी जाग्या करा जीवन सुंदर बनेल..! डॉ. प्रकाश आंबेकर

 जालना-चांगल्या आणि वाईट अनुभवांनी जीवन बनलेले असते, मात्र चांगल्याच आठवणी जाग्या केल्या व वाईटांना थारा दिला नाही तर मानवी जीवन सुंदर बनेल असे प्रतिपादन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष , मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
 येथील जिल्हा कारागृहात मानस फाउंडेशन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तान तणाव व्यवस्थापन’ या विशेष व्याख्यानात डॉ. आंबेकर बोलत होते, याप्रसंगी अध्यक्षस्थानी विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश रेणूप्रसाद पारवेकर होते तर व्यासपीठावर गौरीशंकर चव्हाण, तुरुंगाधिकारी बी. जे. जाधव, कैलास काळे, डॉ यशवंत सोनुने, नामदेव जाधव आणि सतीश खरटमल यांची उपस्थिती होती.
 पुढे बोलतांना डॉ. आंबेकर म्हणाले की, जीवन जगताना अनेक गोष्टींनी ताण तणाव निर्माण होतात. जसे की भविष्याचा अतिविचार करणे, स्पर्धा, हाव असमाधानी करते. यासाठी स्पर्धेपेक्षा सहकार्याची भावना ठेवा, जे द्याल तेच मिळेल. समाजाला प्रेम द्या समाज ते व्याजासह परत करतो. चांगले छंद जोपासा. नकारात्मक विचार मनात आणू नका. असा सल्ला यावेळी त्यांनी कैद्यांना दिला.
आपला ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालय आवश्यक आहे. ज्या देशात मनोरुग्णालय जास्त तेथे तुरुंग कमी असतात आणि तेथे गुन्हे कमी घडत असतात. ज्या देशात मनोरुग्नालय कमी आहे अशा देशात तुरूंगांची संख्या जास्त असते असेही ते यावेळी म्हणाले.
 अध्यक्षीय समारोपात न्यायाधीश रेणूप्रसाद पारवेकर म्हणाले की, इतर व्यक्ती आपल्याशी कसा व्यवहार करतात त्या पेक्षा आपण त्यांच्या सोबत कसा व्यवहार करतो हे महत्त्वाचे आहे. समाजात सर्वच लोक वाईट नसतात . चांगुलपणाला आपण स्वीकारला पाहिजे आणि वाईटाला विरोध केला पाहिजे.कारागृह कायम स्वरुपी राहण्याचे ठिकाण नाही. इथे पुन्हा येऊच नये. आपल्या हातून पुन्हा वाईट काम होऊ नये. यासाठी तणाव मुक्त जीवन जगले पाहिजे आणि इतरांना मदत केली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
या प्रसंगी तुरुंग अधिकारी बी. जे. जाधव, गौरीशंकर चव्हाण आणि कैलास काळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशवंत सोनुने यांनी केले तर आभारप्रदर्शन सतीश खरटमल यांनी केले.
दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button