Jalna Districtजालना जिल्हा

जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आता मटका मिसळ आणि गुळाच्या पाकातील जिलेबी

जालना- जालना शहर फक्त आता उद्योग व्यवसायातच नव्हे तर जिभेचे चोचले पुरविण्यातही पुढे यायला लागलं आहे. जालनेकरांची ही  खवय्येगिरी लक्षात घेवून” स्व वऱ्हाडी” मिसळपाव हे झणझणीत मटका मिसळचे केंद्र सुरू झाले आहे .

एखादा व्यवसाय एका समूहाने केला की त्याला वेगळेच स्वरूप प्राप्त होतं .चार-पाच वर्षापूर्वी एका समूहाचा चहा बाजारात आला आणि अवघ्या काही महिन्यांमध्येच गल्ली बोळात तशा प्रकारची विविध चहाची दुकाने सुरू झालेली दिसली. आता जालना शहरात आर.के.फूड यांच्या उपक्रमातून” स्व वऱ्हाडी मिसळ” या मटका मिसळ आणि गुळाच्या पाकातील जिलबी हे वैशिष्ट्य घेऊन वऱ्हाडी मंडळींनी जालन्यात दुकान थाटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अलमंड हॉटेल समोर स्व वऱ्हाडी  मिसळपाव या अस्सल वैदर्भीय झणझणीत मटका मिसळीच्या या प्रतिष्ठान चे उद्घाटन ह .भ .प. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या हस्ते आज झाले. ठाणे येथील आर.के. फूड या  उद्योग समूहाची ही ३७ वी शाखा आहे.  राहुल वखरे आणि दीपाली शेजवलकर हे या शाखेचे संचालक आहेत, तर गजानन आंधळे ,मनोहर पाटील, आणि तुषार सोनार हे तिन्ही संचालक आज या उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते.

दरम्यान संचालकांनी  वैशिष्ट्य सांगताना सांगितलं की ,मातीच्या भांड्यात तयार करून मातीच्याच भांड्यातच ग्राहकांना ही मिसळ देण्याचा प्रयत्न आहे.  त्यासोबत या मिसळ साठी वापरण्यात येणारे मसाले देखील विशिष्ट प्रकारचे आहेत आणि जिलेबी साठी लागणारा गुळाचा पाक ही विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या गुळापासून केला जातो. त्यामुळे येथील पदार्थांची चव नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळी असणार आहे.

 

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles