Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

शहरातील संग्रामनगर भागातून चार धारदार शस्त्र जप्त

जालना- बसस्थानक परिसरात असलेल्या संग्रामनगर भागात एका घरांमधून सदर बाजार पोलिसांनी तीन तलवारी आणि एक खंजीर जप्त केला आहे. सदर बाजार पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या पोलिस ठाण्याचे भोकरदन नाका पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल यांच्या पथकाने आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास धाड टाकून ही कारवाई केली.


त्या ठिकाणी असलेल्या दोन  संशयित व्यक्तींची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याजवळ तीन तलवारी आणि एक खंजीर अशी एकूण चार धारदार शस्त्रे सापडली आहेत.


याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात आरोपी उमेश अर्जुन शेळके (वय 20) आणि संदीप दीपक चांदणे (वय 24) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर बाजार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस अंमलदार कैलास खार्डे, भरत ढाकणे, सोपान क्षीरसागर आदींनी  ही कारवाई केली.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button