Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सौम्य लाठीमार केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात

जालना -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काल दिनांक 14 एप्रिल रोजी जयंती होती. मस्तगड परिसरात दिवसभर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनुयायांनी आनंदोत्सव साजरा केला, आणि संध्याकाळी मिरवणूकही काढली .रात्री 10 वाजेच्या सुमारास लोखंडी पूल ओलांडल्यानंतर सुभाषचंद्र बोस चौकात ही मिरवणूक आली .अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सुरू असलेल्या मिरवणुकीमध्ये विविध रंगांचे झेंडे फडकायला लागले आणि पाहता पाहता या झेंड्याची टक्कर सुरू झाली. हा सर्व प्रकार मिरवणुकीदरम्यान बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीस यंत्रणेच्या लक्षात आला आणि त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला.

गर्दी मोठी असल्यामुळे कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला काबूत आणले, आणि पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान सरकारच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक नागनाथ भताने यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रारही नोंद केली आहे. 80 ते 90  समाजकंटकांनी सार्वजनिक शांततेचा भंग व्हावा या हेतूने बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला आणि एकमेकांना काठ्यांनी मारण्याचाही प्रयत्न केला असे या तक्रारीत म्हटले आहे. आज दिनांक 15 रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही तक्रार नोंद करण्यात आली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button