Jalna Districtजालना जिल्हा

हनुमान जयंती विशेष; वानरसेनेला वैतागून इथे आहेत बंदिस्त घरे

monkey on road

जालना -आज महारुद्र हनुमान जयंती .प्रभूश्रीरामांनी ज्या वानर सेनेच्या जीवावर लंकेच्या रावणासोबत युद्ध केलं आणि सीता मातेला परत आणलं त्या वानर(लाल तोंडाच्या या वानरांनाआपल्याकडे माकड म्हणतात) सेनेचा जन्मदिवस. त्यामुळे श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या आयोध्येमध्ये या वानर सेनेच्या कोणी नादी लागत नाही, आणि तिथे यांचा मुक्त संचार असतो. एवढेच नव्हे तर वारंवार या सेनेला आळा घालणे शक्य होत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराचे स्वरूप बदलून घेतले आहे. घर, मंदिर, हॉटेल, लॉज, कुठेही जा या वानरांचा तुम्हाला मुक्त संचार दिसेल. अयोध्येत असलेल्या श्री हनुमान गडी या मंदिरात तर हनुमानाच्या पायथ्याशी सुद्धा ही वानरसेना जाऊन बसते, एवढेच नव्हे तर भाविकाने जर प्रसाद आणला असेल तर आणि तुमचं जर प्रसादा कडे लक्ष नसेल तर तो हनुमान पर्यंत पोहोचलात म्हणून समजा! तुम्हाला घरी देखील आणण्यासाठी प्रसाद राहत नाही.

एकीकडे मंदिरात वानरांची ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे नागरिकांच्या निवासस्थानाची वेगळीच परिस्थिती आहे. कुठलीही वास्तू असो ती पूर्णपणे काटेरी तारा आणि लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त आहे, कारण ही वानरसेना कुठेही जाऊन खाण्यापिण्याचे पदार्थ लंपास करते. घरावर पाण्याची टाकी उघडून पाणी पिण्यालाही ते घाबरत नाहीत ,त्यामुळे पाण्याच्या टाकी ला देखील तारेचे कुंपण घालावे लागते. रस्त्यावर असलेल्या विजेच्या खांबांना काटेरी तारा तर आहेतच मात्र घराच्या संरक्षण भिंती वर देखील काटेरी तारा लावून या माकडांचा बंदोबस्त केला आहे.

रस्त्यावर कुठेही विजेच्या तारा नाहीत, त्यामुळे या वानरांचा अपघातापासून निश्चितच बचाव होतो. परंतु आयोध्ये मध्ये नवीन आलेल्या भाविकांसाठी मात्र हा एक भितीदायक प्रकार आहे. कोणतं माकड कुठून येईल आणि कोणाची बॅग किंवा हातातील खाण्यापिण्याची वस्तू पळवेल याचा काही नेम नाही. रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये जर खाण्याचे पदार्थ तयार करणे सुरू असेल तर क्षणार्धात माकडाने उडी मारून तो पदार्थ पळविलाच समजा. अशा या माकडांना प्रभू श्रीरामांनी अभय दिलं होतं त्यामुळे त्यांच्या वानर सेनेकडे आयोध्यावासी देखील आता दुर्लक्ष करीत आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button