बंद हॉटेलच्या खुर्चीवर सापडले नवजात अर्भक
जालना-जालना – अंबड रस्त्यावर लालवाडी पाटीजवल सकाळी संतोष आसाराम चव्हाण (४५) हे पाच वाजेच्या सुमारास फिरत होते. त्यावेळी त्यांना पारनेर शिवारात बंद असलेल्या सावता हॉटेलमधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला.
म्हणून त्यांनी हॉटेलच्या जवळ जाऊन पाहिले त्यावेळी एका खुर्चीवर कापडामध्ये पुरुष जातीचे नवजात अर्भक गुंडाळलेले असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी हॉटेलमालक दामोधर खरे यांना झोपेतून उठवून माहिती दिली. त्या दोघांनी परिसरात काहीकाळ या अर्भकाच्या नातेवाईकाचा शोध घेतला. मात्र ते कुठेच दिसले नाहीत.
अंबड पोलीस ठाण्याचे सपोनि. नितीन पतंगे यांना माहिती दिल्यानंतर त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अर्भकास जालना येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केले आहे.
सध्या बाळावर उपचार सुरु असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. याबाबत भादंवि. 317 कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाळाच्या नाळाला टॅग लावलेला असून, उजव्या पायाच्या पंजाचा ठसा घेतल्याची शाईची निशाणी आहे, त्यामुळे त्याचा जन्म एखाद्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या बाळासोबत अंबडचे पोलीस कर्मचारी विष्णू चव्हाण, महिला पोलीस सविता वीर, सुधाकर शेंडगे, देवधन ढेंगळे हे थांबले होते.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com