Jalna Districtजालना जिल्हा

तीस लाखांचा अवैध गुटखा जप्त

जालना -स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी भोकरदन तालुक्यातील राजूर येथे आज पहाटे छापा मारून ३० लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्नाटक राज्यातून जालना जिल्ह्यात हा गुटखा विक्रीसाठी येत होता. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजूर येथे एका वाहनाला अडवून त्याची झडती घेतली असता यामध्ये महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदीअसलेला हिरा नावाचा गुटखा आणि पान मसाला सापडला आहे.

सुमारे 30 लाख रुपये किमतीचा हा गुटखा आणि 24 लाख रुपये किंमतीची दोन वाहने ,स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणातील राजूर येथील संशयित आरोपी संदीप भुमकर यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles