वाहनधारकांनो सावधान! सोमवार पासून महामार्ग पोलीस करणार वाहनांची विशेष तपासणी
जालना- उन्हाळ्यामध्ये रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी सोमवार दिनांक 25 पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे .त्यामुळे वाहनचालकांनो सावधान व्हा आणि नियमांचे पालन करा! अन्यथा तुमच्या खिशात चाप बसू शकतो. खिशात पैसे नसतील तर तुमच्या वाहनाच्या नावावर तो दंड टाकला जाईल आणि तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे नियमांचे पालन करूनच वाहन चालवा असे आवाहन महामार्ग वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय दंडगव्हाळ यांनी केले आहे.
वाहन चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. रस्त्यावर लिहिलेल्या वाहनाच्या वेग मर्यादेपेक्षा जास्त मर्यादेने वेगाने वाहन चालवू नका, वाहनाची आसन क्षमता पाहूनच त्याचा वापर करा , रस्ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान काहीजण नियम तोडून जरी पळाले तरी त्यांच्या वाहनाच्या नावावर दंड टाकल्या जाऊ शकतो, त्यामुळे पळवाट न काढता वाहनांचे नियम पाळावेत आणि अपघात टाळावेत असेही श्री. दंडगव्हाळ यांनी सांगितले आहे.
दरम्यान सर्वात जास्त अपघात हे दुचाकीस्वारांचे होत आहेत. त्यामुळे वाहन क्षमता पाहूनच प्रवास करावा आणि वेगमर्यादेला लगाम घालावा असेही ते म्हणाले. सन 2020 मध्ये 1411 दुचाकीस्वारांना हेल्मेट नसल्यामुळे दंड भरावा लागला आहे, 2021 मध्ये याची संख्या वाढून 8 849 दुचाकीस्वारांना दंड भरावा लागला आहे. आणि आजही त्यासंदर्भात कारवाई सुरूच आहे. वाहनधारकांकडून दंड वसूल करणे हा उद्देश नसून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वेगमर्यादेला आळा घालण्यासाठी ही उपाय योजना करण्यात येणार असून हे सर्व दंड वाहनधारकांच्या हिताचेच आहेत त्यामुळे त्यांनी याला प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.
बातमी अशी;जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com