Jalna Districtजालना जिल्हा

प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी धरणे आंदोलन

जालना- प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक 22 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून दिली आहे.

 

सातव्या वेतन आयोगा मध्ये वेतन निश्चिती होताना शिक्षकांच्या बाबतीत निर्माण झालेल्या गंभीर त्रुटी चे निराकरण करावे, 1 जानेवारी 2004 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना पदवीधरांसाठी देय असणारी वेतन श्रेणी अनुज्ञेय आहे. असा उल्लेख कुठेही आढळत नाही त्यामुळे वर्ग 5 वी, सातवीसाठी मान्य असलेल्या पदांपैकी केवळ एक प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे पद भरले जात होते व इतर सर्व शिक्षक त्या वर्गाला शिकवत होते. त्यामुळे 25 टक्के शिक्षकांना वेतन श्रेणी लागू केली जात होती, मात्र हा निकष शिक्षण हक्क कायदा 2009 लागू झाल्यानंतर प्रत्येक वर्गासाठी एक याप्रमाणे वर्ग सहावी ते आठवीसाठी भाषा, गणित व सामाजिक शास्त्र अशी तीन स्वतंत्र पदवीधर पदे निर्माण झाली आहेत त्यामुळे झालेला गोंधळ स्पष्ट करावा. या मागण्यांसाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला शिक्षक परिषदेचे अध्यक्ष मंगेश जैवाळ, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष लक्ष्‍मण नेवल, वेतन त्रुटी समिती संयोजक महेश देशमुख ,पदवीधर संघर्ष समिती समन्वयक देवेंद्र बारगजे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष ईश्वर गाडेकर, प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय उपाध्यक्ष विनोद अडसूळ, प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सुभाष भडांगे ,जालना तालुका शिक्षक पतसंस्थेचे सचिव जे. बी. शिंदे ,जुनी पेन्शन हक्क योजनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संतोष देशपांडे यांची यावेळी उपस्थिती होती.

बातमी अशी;जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles