भागवताचार्य मृदुलकृष्ण गोस्वामी यांच्या वाणीतुन गुरुवारपासून श्रीमद् भागवत कथा
जालना- नवीन जालना येथील गायत्री मंदिर परिसरात गुरुवार दिनांक 21 पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरुवात होणार आहे. वृंदावन येथील राष्ट्रसंत व आंतरराष्ट्रीय ख्यतीचे भागवताचार्य श्री मृदुलकृष्ण गोस्वामीजी हे आपल्या वाणीतुन भाविकांना भागवत सांगणार आहेत.
यासंदर्भात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली. श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीचे अध्यक्ष घनश्याम गोयल, महासचिव अंकुश राऊत, मुख्य यजमान कश्मीरीलाल अग्रवाल यांची यावेळी उपस्थिती होती.
* असे आहेत कार्यक्रम*
गुरुवार दिनांक 21 रोजी सकाळी आठ वाजता डॉ. राजेंद्र प्रसाद रस्त्यावरील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा निघणार आहे. दाणाबाजार फुलबाजार मार्गे परत बडी सडक ला जाऊन श्रीराम मंदिराजवळच या शोभायात्रेचे विसर्जन होणार आहे. दरम्यान विविध भजनी मंडळी, टाळकरी, संतांच्या वेशभूषा केलेले बालगोपाल, शहनाई वादन ब्रह्मवृंद अशा विविध प्रकारचे देखावे आणि संत महंत या शोभायात्रेत असणार आहेत. त्यानंतर दररोज दुपारी 2 ते सायंकाळी 6 पर्यंत श्रीमद् भागवत कथा सांगण्यात येणार आहे भागवत कथा झाल्यानंतर दररोज महा प्रसादही भाविकांना मिळणार आहे. दिनांक 28 रोजी किशोर तिवारी हे नानी बाई का मायरा हा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान सादर करणार आहेत. गायत्री नगर परिसरात सुमारे चाळीस हजार चौरस फुटावर भव्य सभामंडप आणि वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे .संभाजी नगर ,नविन मोंढा, आणि रिलायन्स पेट्रोल पंप अशा तीनही बाजूने या कथा स्थळावर येण्यासाठी रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे. दरम्यान उष्णतेचे दिवस लक्षात घेता सभामंडपामध्ये वातानुकूलित यंत्रना सज्ज राहणार आहे. भागवत कथा सुरळीत पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी स्वागताध्यक्ष गोविंद प्रसाद मुंदडा, पुरुषोत्तम जयपुरिया, महेश सारस्वत, डॉ. कैलास दरगड, कार्याध्यक्ष ओमप्रकाश मंत्री, अनिल सोनी, विष्णू पाचफुले, सचिव विजय राठी, कैलासचंद चंदभानानी, संघटन मंत्री मनीष तवरावाला, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी अशी;जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com