शतावरी आणि अश्वगंधा आयुर्वेदिक वनस्पती लागवड प्रकरणी आष्टी पाठोपाठ घनसांगवीतही गुन्हे दाखल
जालना-आयुर्वेदिक वनस्पती चे बियाणे दिल्यानंतर येणारे उत्पादन घेण्याचा करार करणाऱ्या कंपनीने हे उत्पादन न घेतल्यामुळे परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्यात कंपनीच्या दोन भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे .आज बुधवार दिनांक २७ रोजी त्यांना परतुर येथील न्यायालयात हजर केले जाईल. त्याच्या पाठोपाठ अशाच प्रकारच्या फसवणुक प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या आरोपींची जामीनावर जरी सुटका झाली तरी घनसांवगी पोलीस लगेच त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. एकंदरीत जालना जिल्हात आता शतावरी आणि अश्वगंधा या पिकांच्या खरेदीची हमी देणाऱ्या कंपनी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
कपिल बाबासाहेब आकात यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ,१० फेब्रुवारी २०२० च्या सुमारास औरंगाबाद येथील राजेश इंडिया ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, च्या दोन संचालकांनी आपली भेट घेऊन शतावरी आणि अश्वगंधा या आयुर्वेदिक वनस्पतींची रोपे दिली. प्रत्येकी वीस रुपयाला एक रोप असे अकरा हजार रोपे दिली, त्याबदल्यात एक लाख दहा हजार रुपये नगदी आणि एक लाख दहा हजार रुपये पिकाचे उत्पादनातून कपात करण्याचे ठरले. त्यानुसार परतूर तालुक्यातील माव शिवार मध्ये गट २४ मधील ८० आर शेत जमिनीवर या पिकाची लागवड केली. अठरा महिन्यानंतर हे पीक माझ्या शेतात बहरून आले, आणि करारानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांना या पिकाच्या खरेदीसाठी पाठपुरावा केला. त्यांचा काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे हे पीक शेतातच वाळून गेले आणि नष्ट झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी पंचनामा केलेला आहे. या पंचनाम्यानुसार सुमारे चार लाखांचे दोन वर्षांचे नुकसान आणि कंपनीला रोपांच्या बदल्यात दिलेले एक लाख दहा हजार रुपये असे सुमारे पाच लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .सद्यपरिस्थितीत कंपनीचे भाग भागीदार राजेश फलके व सिद्धार्थ हिवाळे यांनी फसवणूक केली आहे.
दरम्यान आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे यांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे आज न्यायालयात हजर केले जाईल.
दरम्यान अशाच प्रकारचा फसवणुकीचा भा.द.वि. कलम ४२० नुसार याच आरोपिवर घनसांगवी पोलीस ठाण्यातही रात्री दहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घनसांगी तालुक्यातील कोठाळा येथील शेतकरी दत्तात्रय त्रिंबक साबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ९० हजार रुपयांचे बियाणे आणि सुमारे दोन लाख रुपयांची शेती अडकून ठेवून २ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक याच कंपनीच्या संचालकांनी केली आहे.
बातमी अशी;जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com