अतुल व्ही. कुलकर्णी जालन्याचे नूतन पोलीस अधीक्षक
जालना -शासनाच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी आज दिनांक 20 रोजी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये चंद्रपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अतुल व्ही. कुलकर्णी हे जालना येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदलून येत आहेत तर जालन्या पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांची अप्पर पोलीस आयुक्त म्हणून पश्चिम प्रादेशिक विभाग मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
जालन्यात बदलून येत असलेले अतुल कुलकर्णी हे 1990च्या बॅच चे भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील पदाधिकारी आहेत.
नांदेड येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी पोलिस दलात कामाला सुरुवात केली. त्यानंतर जळगाव, भंडारा येथे त्यांनी काम केले आहे. केंद्रीय गुप्तचर विभागात दीर्घकाळ काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. त्या सोबत क्राईम ब्रँच मध्येही ते सक्षम अधिकारी म्हणून कार्यरत होते.
बातमी अशी;जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com