Jalna Districtजालना जिल्हा

अंगारकी निमित्त राजुरेश्वराला आंब्यांची आरास; भाविकांनी दिले 19 लाख रुपयांचे दान

जालना- महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वर गणपतीला अंगारकी चतुर्थी निमित्त आंब्यांची आरास करण्यात आली होती. गणपतीच्या मूर्ती भोवती केशरी रंगात हिरवेगार आंबे अधिकच खुलून दिसत होते. त्यासोबत मुख्य गाभाऱ्याला देखील या आंब्याचे तोरण होते. त्यामुळे एक सुंदर नयनरम्य देखावा पहायला मिळत होता.

दरम्यान उन्हाळा असल्यामुळे अनेक भाविकांनी दुपारी मंदिराकडे जाण्याचे टाळले मात्र संध्याकाळी हळूहळू ही गर्दी वाढली आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांचे दर्शन घेणे चालू होते. मंगळवारी मध्यरात्री अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने पहिल्या पूजेचा मान औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या वासडी या गावचे ग्रामस्थ श्री. व सौ. अनिता रावसाहेब नागरे यांना मिळाला. त्यांच्यासोबत संस्थांनचे पदाधिकारीही उपस्थित होते.

दरम्यान अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी केलेल्या दानामध्ये पावती स्वरूपातील देणगी मध्ये, सात लाख 62 हजार पाचशे रुपये ,अभिषेक पावती साठी 65 हजार 953 रुपये बांधकाम देणगीसाठी 25 हजार 110 रुपये, मार्बल अर्पण करणाऱ्यांसाठी 80 हजार 160 रुपये. अशी एकूण 9 लाख 37 हजार 723 रुपये पावती च्या माध्यमातून जमा झाले आहेत. दानपेटी मध्ये पाच लाख 86 हजार तीनशे आठ रुपये, बांधकाम दानपेटी मध्ये 3 लाख 84 हजार 508 रुपये असे दोन्ही मिळून एकूण 19 लाख 4 हजार 539रुपये अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी श्री गणपती संस्थांनला दान केले आहेत. दर महिन्याच्या चतुर्थी ला राजूर परिसरातील पंचवीस-तीस किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरुन भाविक दर्शनासाठी पायी येतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे अनेक गणपतीच्या दर्शनासाठी पायी गेले होते.

बातमी अशी;जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button