Jalna Districtजालना जिल्हा

शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याच्या बाहेर जाऊनही काम करणारा” १०० शिक्षक क्लब ऑफ जालन”

जालना- आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून काही शिक्षक एकत्र आले आणि पाहता पाहता शंभर शिक्षकांचा एक क्लब स्थापन झाला.

क्लब स्थापन झाल्यावर विविध विषयांवर चर्चा झाली आणि मग सुरुवात झाली ते काम काय करायचं कोणासाठी करायचं? कसं करायचं ?आणि मग हळूहळू या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळायला लागली. राजाभाऊ मगर या सह शिक्षकाच्या संकल्पनेतून हा क्लब स्थापन झाला .क्लब स्थापन झाल्यावर फक्त विद्यार्थ्यांसाठीच काम करायचं का असाही प्रश्न समोर आला मात्र फक्त विद्यार्थ्यांनाच मदतीची गरज असते असं नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही असते, काही शिक्षकांनाही असते, आणि समाजातील काही घटकांना देखील मदतीची गरज असते. ही गरज डोळ्यासमोर ठेवून सर्वांसाठीच काम करण्याचे ठरले, परंतु पैशाचे सोंग करता येत नाही मग पैसा कसा उभा करायचा!

तो पैसा उभा करण्याला 100 शिक्षकांच्या क्लबने सुरुवातीला स्वतःच्या खिशाला झळ लावत काही उपक्रम हाती घेतले. हळूहळू त्यांच्या मदतीला इतरही शिक्षक धावून आले. या सर्व शिक्षकांची धडपड आणि काम करण्याची पद्धत पाहून आता दानशूर ही मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत जोडले गेले आहेत. कोणत्याही बाबतीत शासनावर अवलंबून नसलेला आणि कुठल्याही बाबींसाठी शासनाला जाब किंवा मागण्या न मागणारा हा एक सामाजिक क्लब सुरू झाला आहे.

आत्तापर्यंत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप काही शिक्षकांना मदत, कोविड काळात जीवाची बाजी लावून काम करणार्‍या, शिक्षक पोलीस प्रशासन, आणि अन्य क्षेत्रातील covid-19 योद्ध्यांचा सन्मान क्लबच्या वतीने करण्यात आला आहे. आज आज दिनांक 21 रोजी सी. टी. एम. के. गुजराती शाळेमध्ये देखील अशाच प्रकारचा एक मोठा मदत देण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये शालेय साहित्य, सायकल ,अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांच्या कामी येणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. हळूहळू हा क्लब वाढत जाऊन आता जालन्या पुरताच मर्यादित राहिलेला नाही तर मराठवाड्यातही अनेक ठिकाणी या क्लब पासून प्रेरणा घेऊन कामे सुरू झाली असल्याची माहिती या क्लबचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद केंद्रीय शाळा काजळा येथील मुख्याध्यापक आर. आर. जोशी यांनी 100 क्लब ऑफ जालना च्या माहिती देणाऱ्या विशेष मुलाखतीमध्ये दिली आहे.

बातमी अशी;जिच्यावर                        तुम्ही  ठेवणार विश्वास
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles