……तर मी आग्रही- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
जालना -बंधनकारक नाही मात्र मी आग्रही आहे! असं सूचक आणि सर्वांनाच अप्रत्यक्षपणे बंधन घालणार विधान केला आहे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी. कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल दि.22 रोजी जालन्यात आढावा बैठक घेतली .या बैठकीसाठी ते खास औरंगाबाद येथून जालन्यात आले होते.
जालना जिल्हाधिकार्यांच्या गाडीच्या बाजूलाच या जिल्हाधिकार्यांचीही गाडी उभी होती. नेहमी चकाचक दिसणारा या गाड्यांवर मागच्या बाजूला एक कागद चिटकलेला दिसला म्हणून सहजच हा कागद वाचला, तर त्यावर लिहिलेला संदेश हा बरच काही सांगणारा आणि स्वतःला विचार करायला लावणारा होता. त्यावर लिहिलेलं होतं “माझी स्वच्छ कार आहे. या कारमध्ये डस्टबिन आहे. कचरा कारमधून बाहेर फेकला जात नाही” एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार सार्वजनिक ठिकाणी सांगितलेल्या सुचने पेक्षा स्वतःपासून सुरू केलेलं एखादं काम अनेकांना प्रोत्साहित करणारा आणि तसं करायला भाग पाडणारं असतं! असाच कांहीसा संदेश आहे. या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, “कचऱ्याच्या व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कचरा योग्य ठिकाणी आणि योग्य वर्गीकरण करून वाळलेला कचरा, ओला कचरा, आणि हानिकारक कचरा, अशा प्रकारे वर्गीकरण केलं तर स्वायत्त संस्थांना ती मदत होते. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी ही याची मदत होईल. सर्वांना बंधनकारक करण्यापेक्षा याची सुरुवात माझ्यापासून केली आहे आणि सर्वांनी तसं करावं अशी आपली आग्रही भूमिका आहे.”
जिल्हाधिकार्यांनी स्वतःपासून सुरू केलेल्या या मोहिमेला प्रत्येक वाहन चालक आणि मालक प्रतिसाद देऊन स्वच्छतेच्या या राष्ट्रीय कार्याला हातभार लावू शकतो. तर लावणार ना आपणही हातभार!
*बातमी अशी; जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर* ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com