पुलाखाली आग जीवित व वित्त हानी नाही
जालना -शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी वर असलेल्या पुलाच्या खाली कचऱ्याच्या ढीगाला आला आज दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली.
आग कशामुळे लागली हे मात्र निश्चित नाही. दरम्यान नदीच्या पात्रांमध्ये पुलाच्या खाली भंगार , पेपर, प्लास्टिक, आणि कचरा अशा प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.
कदाचित हे साहित्य जाळून टाकण्यासाठीही हा प्रयत्न केला गेला असावा ,अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या कचऱ्या मध्ये प्लास्टिकचे प्रमाण जास्त असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूनी धुराचे मोठे लोळ दिसत होते. प्लास्टिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाऱ्या धुरामुळे आग खूप मोठी आहे की काय? असा भास होत होता मात्र तसे काहीच नव्हते. कचऱ्याला लागलेली ही किरकोळ आग होती. दरम्यान या आगीमध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली , तसेच या प्रकरणी अग्निशमन दलाकडे कोणतीही नोंद नाही.
*बातमी अशी; जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर* ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com