Jalna Districtजालना जिल्हा

रात्रीच्यावेळी वाळू वाहतुकीने घेतला तरुणाचा बळी

जालना -रात्री-बेरात्री सुरु असलेल्या वाळूच्या अवैध धंद्यांने 21 वर्षीय तरुणाचा बळी घेतल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास मंठा तालुक्यात घडली.

मंठा तालुक्यातील वाघाळा घाट येथे पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपशाचा घाट आहे. रात्री दहा वाजेच्या सुमारास दहा टायर चा ट्रक क्रमांक एम एच 21 बी यु 88 55 हा वाळू घेऊन पात्रातून बाहेर निघाला आणि सचिन विलास खंदारे हा (वय 20) तरुण रिकामा ट्रक क्रमांक एम एच 37 बी 17 24 घेऊन वाळू घाटाच्या दिशेने जात होता. रात्री दहा वाजेच्या सुमारास या दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली.

या अपघातामध्ये सचिन खंदारे यांच्या ट्रक चा समोरच्या भागाचा चुराडा झाला आणि सचिन जखमी झाला. त्या परिस्थितीत त्याचे नातेवाईक सुमित खंदारे भारत खंदारे केशव खंदारे यांनी रात्री जलन्याकडे उपचारासाठी सचिनला घेऊन येऊ लागले, दरम्यान एक वाजेपर्यंत सचिन आणि त्याच्या नातेवाईकांसोबत बोलणे सुरू होते, मात्र रामनगर सुटल्यानंतर सचिनची प्राणज्योत मालवली.

रात्री बेरात्री सुरू असलेल्या या वाळूच्या व्यवसायामुळे एका 20 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान सचिनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील सामान्य रुग्णालयात आणला असल्याची माहिती सचिनचे नातेवाईक सुमित खंदारे यांनी दिली आहे.

*बातमी अशी; जिच्यावर  तुम्ही ठेवणार विश्वास!*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर* ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button