जिल्ह्यात 479 विविध विकास कार्यकारी सोसायट्यांची निवडणूक निवडणूक
जालना जिल्ह्यातील 479 विविध कार्यकारी सोसायट्यांची निवडणूक पुढील महिनाभरात पार पडणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी आवश्यक असलेला निधी अद्यापही 163 संस्थांनी जमा न केल्यामुळे तिथे प्रशासक नियुक्तीच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत.
जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की जालना जिल्ह्यामध्ये 479 विविध विकास कार्यकारी सोसायट्यांची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक घेण्यासाठी संबंधित संस्थांकडून सरकारकडे निधी जमा करावा लागतो. अशा 316 संस्थांनी सरकारकडे निधी जमा केला आहे आणि अद्यापही 163 संस्था निधी जमा करण्याच्या बाकी आहेत. त्यामुळे या संस्थांवर प्रशासक नियुक्त करून हा निधी जमा केला जाईल. जोपर्यंत हा निधी जमा होत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत .
जालना जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय निवडणूक होणाऱ्या विविध विकास कार्यकारी सोसायटी यांची संख्या पुढील प्रमाणे दुसरी संख्या निधी जमा असलेल्या संस्थांची.जालना 58 /46,बदनापूर 50/ 34, भोकरदन 93/00, जाफराबाद 58/ 52 ,मंठा 28/ 17, परतुर 56/ 20 ,घनसावंगी 69/ 39 ,अंबड 67 /19 अशा एकूण 479 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी 316 संस्थांनी निधी जमा केला आहे.
अशी असते संस्थांची वर्गवारी अ ब क ड अशा चार विभागात या संस्थांची वर्गवारी केल्या जाते.
अ- वर्गामध्ये त्या त्या कार्यालयातील संस्था असतात. उदाहरणार्थ जिल्हा बँक ,सहकारी साखर कारखाना, दूध संघ, सूतगिरणी, आदी.
ब -मध्ये ग्रामीण भागातील विविध विकास कार्यकारी सोसायटी आणि काही पतसंस्था.
क -मध्ये ग्रामीण बिगर शेती मागासवर्गीय सहकारी संस्था मजूर सहकारी संस्था.
ड- मध्ये गृहनिर्माण संस्था, पाणी वापर संस्था, अशा संस्थांचा सहभाग असतो.
निवडणुकांसाठी 40 हजारांचा खर्च. विविध विकास कार्यकारी सोसायटी ची निवडणूक घेण्यासाठी संबंधित सोसायटीने शासनदरबारी सुरुवातीला किमान दहा हजार रुपयांचा तरी निधी जमा करावा लागतो ,आणि त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होते. दरम्यान बिनविरोध निवडणूक झाली तर एवढ्या खर्चामध्ये भागते ,अन्यथा हा खर्च 40 हजारापर्यंत जातो .
निधी न भरणाऱ्या संस्थांचे काय होते?
ज्या संस्थेची मुदत संपलेली आहे मात्र निवडणूक घेण्यासाठी संबंधित संस्थेने पैसे भरलेले नाहीत अशा संस्थांवर जिल्हा उपनिबंधक प्रशासक नियुक्त करतात. हा प्रशासक संबंधित संस्थेच्या सभासदांकडून थकबाकी जमा करून घेतो आणि शासन दरबारी भरतो. जोपर्यंत निधी जमा होत नाही तोपर्यंत निवडणुका होत नाहीत.
*ग्रामीण भागात महत्व* विविध विकास कार्यकारी सोसायटी या संस्थेला ग्रामीण भागामध्ये मोठे महत्त्व आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची उलाढाल होते. तसेच संस्थेच्या अध्यक्षाला मानपानही मिळतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे काही ठिकाणी मोठ्या असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी मध्ये या निवडणुकीसाठी देखील चुरस असते.
*बातमी अशी; जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर* ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com