जालन्यात येणाऱ्या नव्वद तलवारी धुळे पोलिसांनी केल्या जप्त; चार आरोपी जालन्याचे
धुळे – भरधाव वेगाने जाणारी स्कार्पिओ पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन चालकाने गाडी न थांबल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि धारदार 90 तलवारीसह जालन्याचे चार आरोपी धुळे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत याविषयी सविस्तर माहिती दिली.
सोनगीर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना शिरपूर कडून धुळेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ एम एच 09 सी एम.0015 ला थांबवण्याचा प्रयत्न केला,परंतु गाडी चालकाने गाडी न थांबवता जोराने पळवली,म्हणून पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी पाठलाग करून ही गाडी थांबवून विचारणा केली. गाडीत असलेल्या चार जणांची आणि गाडीची झडती घेतली असता गाडीत 90 तलवारी सापडल्या आहेत. सोनगीर पोलिसांनी चारही आरोपींना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे,
ताब्यात घेतलेले चारही आरोपी हे जालन्याचा आहेत त्यामध्ये मोहम्मद शरीफ मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम, कपिल विष्णू दाभाडे , यांचा समावेश आहे. स्कॉर्पिओ गाडी 90 तलवारी सह 7 लाख 13 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून, भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 व मोटार वाहन कायदा कलम 184 239/ 177 प्रमाणे सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे आरोपी चित्तोडगड येथून तलवारी घेऊन जालना येथे जात असल्याची प्राथमिक माहिती चौकशीत समोर आले आहे .यामागील त्यांचा हेतू व संबंध यांचा तपास सध्या धुळे पोलीस करीत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, विभागीय पोलीस उपअधीक्षक प्रदीप मैराळे, सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, यांनी या तलवारींची पाहणी केली.
*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*