Jalna Districtजालना जिल्हा

आत्महत्या केलेल्या 13 शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाची मदत

जालना -जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासन दरबारी आत्महत्याचे काही निकष आहेत आणि त्या निकषानुसार आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या वारसांना शासनाकडून काही मदतही मिळत असते. अशा 13 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शासन दरबारी मदतीसाठी पात्र ठरलेल्या आहेत.

त्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या अंबड तालुक्यात झाल्या आहेत. दरम्यान 30 हजार रुपये पहिला हप्ता आणि उर्वरित 70 हजार रुपये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या वारसाच्या खात्यात जमा होणार आहेत.

*आत्महत्येचा प्रकार* विष पिऊन केलेल्या आत्महत्या 5, गळफास घेऊन केलेल्या आत्महत्या 7 आणि पाण्यात उडी मारून केलेली आत्महत्या एक. अशा एकूण तेरा आत्महत्या झाल्या आहेत.

*अंबड तालुक्यात जास्त* आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये अंबड तालुक्यातील 5 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ भोकरदन मध्ये 3, जाफराबाद आणि घनसांगवी प्रत्येकी 2, जालना 1 तर बदनापूर परतूर आणि मंठा या तालुक्यात सुदैवाने एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही.

*आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादी*
1 समाधान नारायण फलके45, तपोवन गोंधन. 2 सिद्धेश्वर आदिनाथ बुधवंत20 ,अंतरवाली सराटी.
3 दत्ता आसाराम यादव 35, वडीकाळा .
4 संभाजी भाऊसाहेब खांडेभराड 21, चिकनगाव.
5 नारायण तुकाराम पवार 37, वडीकाळा.
6 रंजीत विष्णू जमदाडे, 37 शिराढोण.
7 ज्ञानेश्वर नाथा शिंगटे, 40 चापडगाव .
8 पांडुरंग गणपत हरबक 36, चापडगाव
9 विश्वनाथ लिंबाजी उजेड 50 ,डांबरी.
10 मोहन शेषराव शेळके 38, वरुड बुद्रुक .
11 प्रदीप दिगंबर पाबळे 30 कोपर्डा .विठ्ठलसिंग नवलसिंग जाधव 43, गोदरी भोकरदन )आणि अण्णा पुंजाराम मैद 32 हसनाबाद .
या 13 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv  
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button