वैचारिक श्रीमंती ही फक्त ब्राह्मण समाजाकडेच- जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर
जालना-पैसा सगळ्यांकडे आहे मात्र वैचारिक श्रीमंती ही ब्राह्मण समाजाकडेच आहे. त्यामुळे आनंदी जीवन कसं जगायचं! हे या ब्राह्मण समाजाकडून शिकलं पाहिजे असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी व्यक्त केले.
भगवान परशुराम सार्वजनिक जन्मोत्सव समिती 2022 च्या निमित्ताने समितीतर्फे विविध उपक्रम सध्या सुरू आहेत. त्यामधीलच पहिला उपक्रम दिनांक 28 मे रोजी प्रा. विजय पोहनकर आणि प्रा. रवींद्र मगर यांचा हसू आणि आसू हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर आंबेकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. आंबेकर म्हणाले की, पैसा सर्व समाजाकडे आहे मात्र तो काटकसरीने वापरून ,आहे त्या पैशात महिनाभर परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा हे या समाजाकडून शिकलं पाहिजे. वैचारिक मतभेद असणे ही काही चुकीची बाब नाही, अशाही परिस्थितीत विचारांची देवाण-घेवाण करून या समाजाकडून आनंदी जीवन कसं जगायचं ते शिकलं पाहिजे . दुसऱ्यांना नाव बोट ठेवताना आपण काय करत आहोत याचेही भान असले पाहिजे ,असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर भगवान परशुराम सार्वजनिक ब्रह्मोत्सव समिती 2022 चे अध्यक्ष ऍड. सुनील किनगावकर, स्वागताध्यक्ष विलास नाईक, दिपक रणनवरे, ऍड. बळवन्त नाईक, भगवान पुराणिक, संतोष दाणी, आर.आर.जोशी, सुरेंद्र न्यायाधीश ,आनंदी आयर, अपर्णा राजे, सुलभा कुलकर्णी, विशाखा नाईक, आदींची उपस्थिती होती. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपले विचार व्यक्त केले आणि त्यानंतर हसू आणि आसू हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही समाज बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला.
दरम्यान दिनांक 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पाठक मंगल कार्यालयापासून दुचाकीवरून फेरी निघणार आहे, 1 मे रोजी शनी मंदिर चौकातील आनंदी निवास येथे रक्तदान व उष्माघात प्रतिबंधक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन मे रोजी कर्णबधिर विद्यालय, अंबड चौफुली आणि महिला रुग्णालय गांधी चमन येथे फळ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. 3 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पाठक मंगल कार्यालयापासून शोभायात्रा निघणार आहे .ही शोभायात्रा मस्तगड येथे मंमादेवी ची महाआरती करून समाप्त होणार आहे.
*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*