या व्यायाम शाळेचा सामान्य नागरिकांनीही वापर करावा- मल्लिकार्जुन प्रसन्ना
जालना-पोलिसांसाठी आता अत्याधुनिक व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. या व्यायाम शाळेचे उद्घाटन औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक केएम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या हस्ते आज पार पडले.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, स्टील उद्योजक घनश्यामशेठ गोयल ,सुरेंद्र पित्ती ,यांच्यासह कलश सिड्स चे संचालक समीर अग्रवाल यांचीही उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी बोलताना श्री . प्रसन्ना म्हणाले की, ही आधुनिक व्यायाम शाळा फक्त पोलिसांसाठी नव्हे तर सामान्य जनतेसाठी देखील आहे आणि याचा वापर महिलांनी देखील करावा जेणेकरून ही व्यायाम शाळा सुरू करण्याचा उद्देश सफल होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक संजय व्यास यांनी मानले. कार्यक्रमाला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, तालुका पोलिस ठाण्याचे मारुती खेडकर, चंदंनजिरा चे आर. के. नाचण ,सदर बाजार चे पोलीस उपनिरीक्षक श्री. पायघन यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*