कामगार दिन विशेष; जगु कसं!
परिस्थितीशी दोन हात करत- करत कामगारांच्या कल्याणासाठी आणि कामगारांसाठी असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविणारा एक कामगार हा जेव्हा साहित्यिक होतो त्यावेळेस त्याने मांडलेल्या व्यथा म्हणजे”जगु कसं!”
या साहित्याच्या माध्यमातून बाहेर पडतात आणि या सर्व बाबींचा ऊहापोह करणारी एक विशेष मुलाखत कामगार दिनाच्या निमित्ताने इथे देत आहोत. सामान्य कुटुंबातून पुढे येण्यासाठी आपल्या आईवडिलांनी केलेलं कष्ट आणि भविष्यात पुढच्या पिढीच्या वाट्याला ही परिस्थिती येऊ नये म्हणून समाजाचे भीषण वास्तव्य मांडणाऱ्या एका कंपनीतील कामगाराने “जगु कसं!” या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून परिस्थिती विषद केली आहे. कामगार साहित्यिक शिवाजी तेलंगे, असं म्हणतात ,”समाजाच्या, कामगारांच्या वेदना आपण पैसा देऊन दुर करू शकत नाहीत, मात्र शब्दांच्या माध्यमातून त्या मांडण्याचा प्रयत्न करतो. शब्द हे बळ देणारे असतात शब्दांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीमध्ये प्राणही तयार करू शकतो आणि या शब्दा सारखे स्वस्त आणि मस्त माध्यम दुसरे कोणतेच नाही .
त्यामुळे साहित्यामधून कामगारांच्या व्यथा मांडण्याचा हा प्रयत्न आहे.कामगार साहित्यिक कवी शिवाजी तेलंगे यांच्याशी हा संवाद साधला आहे प्रा. डॉ. सुहास सदाव्रते यांनी.
*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*