कंपाउंडर चे झाले बोगस डॉक्टर आणि गर्भपाताचे मांडले दुकान

जालना- शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या ढवळेश्वर येथे राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा गोरखधंदा सुरू होता. याप्रकरणी आरोग्य विभागाला तक्रार मिळाल्यानंतर तीन दिवस गुप्त माहिती घेऊन 29 एप्रिल ला या बोगस दवाखान्या वर जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे छापा मारला. त्यावेळेस कंपाउंडर असलेले दोन दोघेजण बोगस डॉक्टर म्हणून हा व्यवसाय करत असल्याचे पुढे आले आहे. आणि त्यांच्या हाती लागला तो जिवंत पुरावा . कसा मारला छापा? किती दिवस केला पाठपुरावा? आणि हाती काय लागलं! या विषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*