Jalna Districtजालना जिल्हा

दोन एकर वरील अंगूराची बाग भुईसपाट; 35 लाखांचे नुकसान

जालना- तालुक्यातील धार कल्याण, पिरकल्याण या भागांमध्ये शेतीसाठी पाण्याची व्यवस्था असल्यामुळे बागायतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे 2016 मध्ये धारकल्याण येथील शेतकरी विष्णू संपतराव ढोबळे यांनी अंगुराची बाग लावली आणि ती चांगलीच बहरली. यावर्षी पीकही जोमात आले होते, मात्र निसर्ग कोपला आणि याचा फटका विष्णू ढोबळे यांना बसला.

जालना सिंदखेडराजा रस्त्यावर नाव्हा शिवारात मुख्य रस्त्यालगतच विष्णू ढोबळे यांची अंगूराची बाग आहे. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास जोराचा वारा सुटला आणि यामध्ये सुमारे दोन एकरची ही बाग भुई सपाट झाली आहे.

42 रुपये किलो प्रमाणे काल रात्रीची व्यापाऱ्यांसोबत या अंगुरा चा सौदा झाला होता ,मात्र आता हे अंगूर तोडता येत नसल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जमिनीवर पडलेले अंगूर हे चिखलामध्ये भरलेले आणि फुटलेले असतात त्यामुळे ते जास्त दिवस टिकत नाही नाहीत आणि व्यापारी देखील त्याची तोड करत नाही, मुळात म्हणजे अंगुरावरच वेल पडल्यामुळे अंगूर दिसतच नाहीत. ही बाग पुन्हा उभी करण्यासाठी लोखंडी अँगल आणि बांबू असा एकरी सहा लाख रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे दोन एकर चे 12 लाख आणि 20 लाख रुपयांचे अंगूर असे सुमारे 32 लाख रुपयांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. झालेल्या नुकसानी मधून 20 ते 25 टक्के नुकसान हे या अंगूरामुळे भरून निघण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तविली आहे.

दरम्यान उर्वरित नुकसान शासनाने पंचनामा करून भरून द्यावी अशी मागणी शेतकरी विष्णू संपतराव ढोबळे यांनी केली आहे. बाग पडल्याची बातमी कळताच परिसरातील शेतकऱ्यांनी बागेकडे धाव घेतली मात्र या परिस्थितीमध्ये शेतकरी मदत करत करू शकत नसल्याचे चित्र दिसत आहे.

*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv  
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button