Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

परशुरामांचा भव्य मूर्तीची नवीन जालन्यात मिरवणूक

जालना- अक्षय तृतीया आणि भगवान श्री. परशुरामांच्या जयंतीच्या निमित्ताने नवीन जालना भागात जय परशुराम सोशल ग्रुपच्या वतीने श्री. परशुरामांच्या भव्य मूर्तीची मिरवणूक उत्साहात पार पडली.

बडी सडक येथे असलेल्या श्रीराम मंदिरापासून ही मिरवणूक निघाली होती. नर नारायण मंदिरा पर्यंत जाऊन परत श्रीराम मंदिराजवळ या मिरवणुकीचे विसर्जन झाले.

सुमारे पाच फूट उंचीची भव्य परशुरामांची मूर्ती स्थापन करण्यासाठी नवीनच मागविण्यात आली आहे. लवकरच या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही होणार आहे. तसेच बडी सडक वर असलेल्या श्रीराम मंदिराला देखील 119 वर्ष पूर्ण होऊन120 व्या वर्षात हे श्रीराम मंदिर पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त मंदिरांमध्ये देखील होमहवन आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते.मिरवणुकीमध्ये पं. मनोज महाराज गौड, बबलू सारस्वत, दीपक तिवारी, किशोर मिश्रा, पंकज जोशी, किशोर तिवारी, एड. आनंद झा, आदींची उपस्थिती होती. मिरवणुकीदरम्यान बँड ,ढोल- ताशे आणि सजीव देखाव्या सह महिला आणि युवतींचा ही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv  
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button