मशीदिंसमोर पोलीस बंदोबस्त; भोग्यांचाही आवाज झाला कमी

जालना- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या विषयी केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलेच पेटले होते, आणि समाजही ढवळून निघत होता.
अशा परिस्थितीमध्ये काल अक्षय तृतीया आणि ईद हे दोन्ही महत्त्वाचे सण साजरे झाल्यानंतर आज भोंग्याचे आवाज कमी झाले नाही तर जशास तसे उत्तर देऊ आणि मशीद समोर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा पोलिस प्रशासनाने आज दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान नमाजाच्या वेळी शहरातील प्रत्येक मशिदीसमोर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्यासोबत मशिदीवरील भोंग्याचे आवाजही कमी झालेले ऐकायला मिळाले. दरम्यान जिल्हा विशेष शाखेचे पोलिसही प्रत्येक ठिकाणी भेट देऊन पोलीस बंदोबस्त आहे का नाही? याचीही खात्री करत होते. दुपारच्या नमाजापर्यंत तरी जिल्हात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद शासन दरबारी झाली नाही.
आणखी ताज्या बातम्या पहाण्यासाठी
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com