Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

बालक- पालक, मालक-चालक, अधिकारी- शिपाई, कुंडलिकेच्या स्वच्छतेसाठी सर्वजण सरसावले

जालना -शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना या नदीच्या स्वच्छतेसाठी समाजातील सर्वच स्तर सरसावले आहेत.

एक मे चे अवचित्त साधून जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि उद्योगपतींनी पुढाकार घेऊन समस्त महाजन ट्रस्टच्या माध्यमातून कुंडलिका सीना नदीची स्वच्छता अभियान सुरू केले आहे.

 

या अभियानाला समाजातील सर्वांनीच पाठिंबा देऊन श्रमदान ही सुरू केले आहे. याचा पहिला टप्पा 1 मे रोजी नदीपात्रातील कचरा गोळा करण्यामध्ये पार पडला. असाच दुसरा टप्पा आता 14 मे रोजी पार पडणार आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून अधिकारी ते शिपाई ,बालक ते पालक आणि मालक ते चालक अशा सर्वांनीच यामध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे. उद्योगपती आणि डॉक्टर मंडळी देखील उस्फूर्तपणे कुंडलिका- सीना नदी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, आदींची उपस्थिती होती. उद्योगपती मध्ये सुनील भाई रायठठ्ठा, कैलास लोया, डॉ. संजय राख, अनुराधा राख, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सविता लोया, ग्रीन आर्मी सृष्टी फाऊंडेशनच्या पदाधिकारी प्रतिभा श्रीपत, संगीता मुळे, आदींची उपस्थिती होती. समस्त महाजन ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई यांच्या माध्यमातून हा उपक्रम पूर्ण होत आहे.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv  
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button