Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

आता पे फोन द्वारे लाच ;संस्था चालक फरार ;शिपाई जाळ्यात

जालना- डिजिटलमूळे आधुनिक क्रांती झाली आणि अनेक फायदे समोर यायला लागले. त्यातीलच एक महत्त्वाचा फायदा म्हणजे लाचखोर संस्थाचालकांना या पे फोनचा फायदा होत आहे, आणि त्याला सुरुवात देखील झाली आहे.

पन्नास हजार पैकी पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता पे फोन द्वारे घेतल्याचे उघड झाले आहे, आणि उर्वरित पंचेचाळीस हजारांसाठी फिल्डिंग लावली असता संस्थाचालक लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या तावडीतून फरार झाला आहे. मात्र त्याने खाजगी शिपायाच्या हस्ते लाच स्वीकारत असताना हा शिपाई जाळ्यात अडकला आहे. जालना शहरात तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे स्व. राजीव गांधी मूकबधिर निवासी विद्यालय आहे. या संस्थेमध्ये एक कला शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करत आहेत. त्यांना शासन नियमाप्रमाणे वरिष्ठ शिक्षक वेतन श्रेणी लागू करण्यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांना वारंवार विनंती केली, त्यानंतर मुख्याध्यापकांनी संस्थाध्यक्ष यांनी भेटण्यास सांगितले असल्याचे सांगितले . हे शिक्षक तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्कर गाडेकर यांना भेटले. त्यावेळी गाडेकर यांनी त्यांच्या खाजगी शिपायाच्या खात्यावर पे फोन द्वारे पाच हजार रुपये टाका काम करून देतो असे सांगितले, आणि आणखी पुन्हा 45 हजार रुपयांची मागणी सुरू झाली .तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची 27 एप्रिल रोजी खात्री केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष भास्कर गाडेकर, राहणार गिरसावडी, तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद यांनी त्यांचे खाजगी शिपाई रंजीत राठोड यांच्यामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पाच हजार रुपये पे फोन वर दिलेले होते, उर्वरित पंचेचाळीस हजार रुपये दिनांक पाच मे रोजी जालना -औरंगाबाद रस्त्यावर बदनापूर येथे बालाजी आईस्क्रीम च्या गाडीवर रोख रक्कम देताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भास्कर गाडेकर आणि रणजीत प्रताप राठोड खाजगी शिपाई, स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे निवासी अपंग विद्यालय गिरसावडी, तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद या दोघांच्या विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस निरीक्षक एस. एम. मोटेकर, ज्ञानेश्वर मस्के, शिवाजी जमदाडे, गणेश शेळके, गजानन कांबळे ,आदींनी ही कारवाई केली.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
http://www.edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv  
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button