Jalna Districtजालना जिल्हाराज्य

जालन्यात कोट्यावधींचा आणखी एक भिशी घोटाळा

जालना- शहरातील चंदंनजिरा भागामध्ये सुमारे दोन कोटिंच्या भिशी घोटाळ्यानंतर आता पुन्हा एवढ्याच रकमेचा भिशी घोटाळा उघड झाला आहे. आणि या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान चंदंनजिरा येथे झालेला भिशी घोटाळा हा पती-पत्नी आणि मुलाने केला होता तर जालना तालुक्यातील रेवगाव येथे झालेला हा भिशी घोटाळा पती पत्नी आणि मेहुण्याने केला आहे.

जालना शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर रेवगाव हे गाव आहे. गाव सधन आहेत त्यामुळे इथे आर्थिक सुबत्ता आहे. दरम्यान याचा फायदा घेऊन गावातीलच केश कर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या गणेश राधाकिसन यादव वय 45 याने सुमारे 24 गावकऱ्यांना एक कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी शिवाजी आसाराम कापसे, वय 35 या शेतकऱ्याने तालुका जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गणेश यादव याच्याविरुद्ध भादवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

शिवाजी कापसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शेतीसाठी एक रकमी पैसा उभा करणे अवघड असल्यामुळे भीसी च्या माध्यमातून गावातील काही शेतकरी गणेश यादव यांच्याकडे दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करत होते, आणि ठराविक तारखेला या रकमेची बोली बोलून जो कोणी जास्तीचे पैसे देईल त्याला ही रक्कम दिली जात होती. आणि त्या मधून आलेली जास्त रक्कम सर्वांना वाटून दिल्या जात होती. जानेवारी 2021 पासून हा व्यवसाय सुरू होता. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रकमेच्या आणि वेगवेगळे सदस्य असलेल्या तीन भिशी तो चालत होता. या व्यवसायात त्याला त्याची पत्नी द्वारका गणेश यादव, वय 40 आणि त्याचा मेहुणा विनोद सुराशे राहणार पळसखेडा भट, तालुका चिखली जिल्हा बुलढाणा, हा मदत करत असायचा. दरम्यान गणेश यादव हा रेवगाव येथील स्थायिक आणि स्वतःचे घर असलेला ग्रामस्थ असल्यामुळे गावकऱ्यांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवून हा व्यवहार केला.

शिवाजी कापसे यांना पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी दिनांक 4 मार्च रोजी गणेश यादव यांच्या कडे पैशाची मागणी करण्यासाठी ते घरी गेले मात्र घराला कुलुप दिसले आणि त्यानंतर त्या तिघांच्या ही भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करूनही ते बंद येत होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री शिवाजी कापसे यांची झाली तसेच त्यांच्यासोबत गावातील अन्य 24 जणांची ही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची खात्री झाली. एका व्यक्तीचे सुमारे चार लाख रुपये याप्रमाणे एक कोटीच्या जवळपास ही रक्कम आहे ,आणि अजूनही काही सदस्य तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये येत आहेत. सुमारे दोन कोटींच्या जवळपास हा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान गुरुवार दिनांक 5 रोजी तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राठोड, नवनाथ पाटील यांनी आरोपी चा मेहुणा रहात असलेल्या पळसखेडा भट या गावाकडे तपासासाठी गेले असता हे आरोपी तिथे सापडले. पोलिसांना मदत करण्यासाठी शिवाजी कापसे, उद्धव गोल्डे, संतोष शिंदे ,आदि गावकरी देखील त्यांच्यासोबत गेले होते.

फसवणूक झालेले भिशी सदस्य- शिवाजी आसाराम कापसे, हरिशंकर गोल्डे, गणेश शंकर गोल्डे, सुदाम बाबुराव सातपुते, सुभाष बाबुजी गोल्डे, भगवान तुळशीराम, कैलास सुखदेव , भगवान विष्णू कदम ,संतोष रमेश शिंदे, दिगंबर जनार्दन गोल्डे, ामेश्‍वर बापूराव गोल्डे, पांडुरंग काशिनाथ तेलगड, रामराव गंगाधर, रघुनाथ राधाकिसन कदम ,गणेश गोल्डे ,बाबुराव पत्ते, अशोक गोल्डे ,किशोर दिलीप गोल्डे, विष्णू अंबादास कावळे, आदींचा समावेश आहे.

एम.डी. पोहनेरकर
8275950190

मुख पृष्ठ


https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*

Related Articles