… अन्यथा शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल- ललित बहाळे
जालना- शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख प्रश्नांवर शासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी पत्रकार परिषदेत शासनाला दिला आहे.
शेतकऱ्यांची कर्ज माफी सप्टेंबर २०१९ला जाहीर करण्यात आली पण शासनाने बँकांकडे या कर्जमाफीचा भरणा तब्बल तिन वर्षांनी केला. त्यामुळे या बँका आता शेतकऱ्याकडे तीन वर्षातील रकमेवरील व्याज मागताहेत . हे व्याज शेतकऱ्यांनी न देता शासनाने त्वरित जमा करावे आणि कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना फायदा द्यावा,
सम्रुद्धी महामार्गासाठी अधिग्रहीत केलेल्या जमीनीच्या मोबदल्यात केलेल्या कपातीमुळे मुळे संबंधित शेतकर्यांमधे असंतोष आहे केलेली कपात पुन्हा शेतकर्यांना देण्यात यावी तसेच हरीयाणा सरकारने htBt चाचण्यांना परवानगी दिली परंतु महाराष्ट्रात कंपन्यांनी केलेल्या अर्जाला अर्जाला 4 महीने उलटूनगेले मात्र अजुन महाराष्ट्र सरकारने नाहरकत प्रमाण-पत्र दिले नाही . ते 15 मेच्या आत मध्ये देण्यात यावे असे न झाल्यास हा खरीप काळ वाया जाईल अशी भीती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी व्यक्त केली आहे.
श्री बहाळे यांनी जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दौरा पूर्ण केला आहे आणि विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणींच्या आढावाही घेतला आहे त्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत गिता खांडेभराड, महिला आघाडी मराठवाडा प्रमुख शेतकरी संघटना,
बाबुराव गोल्डे जिल्हा संपर्क प्रमुख शेतकरी संघटना जालना, गजानन पाटील भांडवले, जिल्हा प्रमुख शेतकरी संघटना जालना, डॉ. उत्तमराव काळे जिल्हा प्रमुख शेतकरी संघटना ग्रामिण, पुंजाराम तात्या सुरूंग ,स्वतत्रं भारत पक्ष जिल्हा प्रमुख जालना,संताराम राजबिंडे शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख जालना,नितीन देशमुख, आदींची उपस्थिती होती.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com
एम.डी. पोहनेरकर,8275950190
http://www.edtvjalna.com