तलवारींचीही तीस वर्षाची गॅरंटी; पकडलेल्या दोन तलवारी सोनगीर प्रकरणातील?
जालना- धुळे जिल्ह्यातील सोनगीर पोलीस स्टेशन अंतर्गत 25 एप्रिल रोजी तलवारींचा मोठा साठा सापडला होता आणि या साठ्यामध्ये जालन्यातील चार आरोपी निष्पन्न झाले होते. त्या अनुषंगाने जालना जिल्हा पोलीस खडबडून जागे झाले असून साठ्याचा याचा शोध घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज चंदंनजिरा, सुंदर नगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि चंदंनजिरा पोलिसांनी संयुक्तरित्या छापा मारला आणि दोन तलवारी जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे दोन तलवारी पैकी एक तलवार जुनी आहे तर एक नवीन तलवार आहे. या नवीन तलवारीवर तीस वर्षाची गॅरंटी देखील दिलेली आहे. तलवारी वर लिहिलेल्या मजकूर नुसार “सीरोही की तलवार, 30 साल गॅरंटी” अशा स्पष्ट अक्षरात लिहिलेला आहे. परंतु गॅरंटी कशाची हे मात्र सांगितले नाही.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आणि चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री .नाचण या दोघांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार संयुक्त कारवाई केली आहे .25 एप्रिल ला सोनगीर येथे तलवारींचा मोठा साठा सापडला होता त्या अनुषंगाने जालना शहरात देखील या अवैधरीत्या तलवारी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आणि आज ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चंदंनजिरा सुंदरनगर भागांमध्ये मुजीब शेख सिकंदर याच्याजवळ धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . त्यानुसार पोलिसांनी साक्षीदार सोबत घेऊन शेख मुजीब शेख शिकंदर वय 30 वर्ष, राहणार गवारे नगर, सुंदर नगर जालना. याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या घरात लपवून ठेवलेली एक हजार रुपये किंमत असलेले 81 सेंटिमीटर पाते असलेली तलवार पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे संजय धर्मराज मगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अशाच प्रकारची तक्रार चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सावळे यांनी दिली असून सुंदर नगर भागात राहणाऱ्या अंकुश नारायण मिरकुटे वय 30, वैशाली किराणा दुकानाच्या जवळ, यालाही विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे देखील एक 84 सेंटीमीटर लांबी ची तलवार सापडली आहे. अंकुश मिरकुटे याच्याविरुद्ध देखील भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना चंदंनजिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com