Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

ऐका हो ऐका…मिळवा 1 लाख रुपयांचे बक्षीस

जालना-पीसीपीएनडीटी( गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशिरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र, व्यक्ती किंवा डॉक्टर, संस्था यांची माहिती देणाऱ्यास पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत शासनाच्या खबरी योजनेमधून 1 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.ही घोषणा  जिल्हा शल्य चिकित्सक  तथा जिल्हा समुचित प्राधिकारी पीसीपीएनडीटी  जिल्हा रुग्णालय जालना  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशिरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्र , व्यक्ती किंवा डॉक्टर संस्था यांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक] (जिल्हा सामुचित प्राधिकारी) जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांना द्यावी किंवा हेल्पलाईन क्रमांक 18002334475 या  क्रमांकावर तक्रार नोंदवावी. माहिती देण्याऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, दिलेल्या माहितीची खातरजमा करुन व त्या अनुषंगाने संबंधित सोनोग्राफी केंद्र ,  व्यक्ती किंवा डॉक्टर, संस्था यांचेवर न्यायालयीन प्रकरण दाखल केल्यानंतर संबंधित तक्रारदारास 1 लाख रुपयांचे बक्षीस शासनामार्फत देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

*कायद्याचा उद्देश*
गर्भलिंगनिदानाच्या उद्देशाने प्रसुतीपुर्व निदानतंत्र वापरुन स्त्रीभ्रूण हत्येला बंदी घालण्याचा या कायद्याचा उद्देश आहे.
एमीनीसेंटिस आणि सोनोग्राफीसारख्या प्रसुतीपुर्व चाचण्या अर्भकातील जनुकीय किंवा इतर विकार जाणून घेण्यास उपयुक्त आहेत. मात्र, अनेकदा या चाचण्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग हा अर्भकाचे लिंग जाणून घेण्यासाठी केला जातो आणि मुलगी असल्यास गर्भपात केला जातो असे आढळून आले आहे.
वर नमूद करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत राहीला तर स्त्री-पुरुष लोकसंख्येत मोठी दरी निर्माण होऊन सामाजिक आपत्ती ओढवू शकते.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button