राष्ट्रीय लोक न्यायालयाची फलश्रुती; दहा जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले
जालना -विविध कारणांमुळे न्यायालयात दाखल होण्यापूर्वी किंवा दाखल झालेल्या रखडत पडलेल्या प्रकरणांमध्ये झटपट आणि सन्मान पूर्वक न्याय मिळावा या उद्देशाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार शनिवार दिनांक 7 रोजी देखील राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या न्यायालयामध्ये एकूण 3404 प्रकरणे एकाच दिवसात निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये विशेष बाब म्हणजे अकरा जोडप्यांची घटस्फोटाची प्रकरणे ठेवण्यात आली होती, तडजोडी अंती दहा जोडप्यांनी सन्मानपूर्वक घटस्फोट रद्द करून पुन्हा आपले संसार फुलविले आहेत.
याचसोबत ईतर विविध प्रकरणांमध्ये 3 कोटी 62 लाख 90 हजार रुपयांच्या रकमेची तडजोड करून अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते .त्यामध्ये दिवानी व फौजदारी प्रकरणे ,मोटार वाहन अपघात, नुकसान भरपाई ,विद्युत प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, ठेवण्यात आली होती एकूण 3 हजार 404 प्रकरणे निकाली काढण्यात आली. वीज कंपनी, वित्तीय संस्था, वाहनांचे दंड अशा इतर प्रकरणांमध्ये 3 कोटी 62 लाख 90 हजार 771 रुपयांची वसुली करून तडजोडी अंती प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 14 टेबलच्या माध्यमातून विविध न्यायाधीशांनी हे काम पाहिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेणूप्रसाद पारवेकर यांनी या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com