Jalna Districtजालना जिल्हा

तो हमालीच्या आडून व्यापाऱ्यांवर ठेवायचा नजर आणि साथीदारांसह पळवायचा रक्कम ;पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जालना -नवीन मोंढ्यामध्ये दिवसा हमाली करत असताना रात्री व्यापारी घरी जाताना त्यांना लुटणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे, पाच आरोपींना ही ताब्यात घेतले आहे.

नवीन मोंढा आणि जालना शहर यामध्ये बरेच अंतर आहे .दिवसभराचा व्यवसाय केल्यानंतर हे व्यापारी रात्री घराकडे येताना दिवसभर आलेली रक्कम सोबत आणतात आणि नेमका याचाच फायदा या हमालांनी घेतला. दिवसभर हमाली करत असताना कोणता व्यापारी कधी निघतो? कसा जातो? कोणत्या रस्त्याने जातो? किती पैसे असतील हा सर्व अंदाज हे हमाल लावायचे आणि त्यांना लुटायचे त्यांचा हा नेहमीचाच धंदा झाला होता. मात्र नुकत्याच 9 तारखेला अमित अशोक कुमार अग्रवाल या व्यावसायिकाला लुटल्यानंतर खळबळ उडाली आणि व्यापाऱ्यांनी जालना पोलिसांच्या नाकावर टिच्चून औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यामुळे आत्तापर्यंत ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही त्या गुन्ह्याचा देखील पोलिसांना तपास करावा लागला आणि योगायोगाने ही टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. परंतु चोरीला गेलेली रक्कम अजून पूर्ण वसूल झालेली नाही. नवीन मोंढ्यातील तिरुपती ट्रेडर्सचे मालक अमित अग्रवाल हे दिनांक 9 रोजी मोंढ्यामधून स्कुटी वरून गोल्डन जुबली मार्गे काली कुर्ती येथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानाकडे येत होते. दरम्यान त्यांच्यागाडीच्या डिकी मध्ये दिवसभर व्यापाराची आलेली रक्कम 6 लाख 92 हजार 300 रुपये होती. गोल्डन जुबली शाळेजवळ आल्यानंतर एका मोटर सायकल वरून दोघे जण आले आणि त्यांची स्कूटी अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून पिस्टल चा धाकही दाखवला आणि स्कूटी घेऊन फरार झाले. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. व्यापाऱ्यांना लुटण्याच्या वाढत जाणाऱ्या कारवायांबद्दल व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आणि माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलीस हे दोघेही कामाला लागले. वेगवेगळी पथके स्थापन झाली, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही लूटमार मोंढा मध्ये हमालाचे काम करणारे या प्रकरणातील आरोपी अतीक शेख याकुब शेख 21, रा. नुरानी मज्जित पाठीमागे, कन्हैय्या नगर जालना आणि फिरोज खान सलीम खान 22 ,व्यवसाय मजुरी कन्हैया नगर जालना व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी केल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार आतिक शेख आणि फिरोज खान या दोघांचा तपास करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी इतर तीन साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले .त्या इतर तीन साथीदारांमध्ये भोल्या भीमराव निकाळजे 27, राहुल विष्णू मुळेकर व 25, शेख सलीम शेख शमशुद्दीन 23 ,हे तिघेही लालबाग येथे राहणारे आहेत.

पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी या लुटमारीचे नियोजन केले होते. त्यानुसार अमित अग्रवाल हे दुकानातून स्कुटी च्या डिकी मध्ये रक्कम ठेवून घराकडे निघताच आरोपी अतीक शेख व फिरोज खान यांनी त्याच्या साथीदारांना माहिती दिली आणि ठरल्याप्रमाणे अग्रवाल यांना गोल्डन जुबली शाळेसमोर अडवून मारहाण करून स्कुटी घेऊन गेले. स्कूटी मधील एकूण रक्कम 6 लाख 92 हजार 300 रुपयांपैकी दोन लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या रकमेमध्ये स्कुटी मोबाइल व हातोडा याची ही रक्कम समावेश आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडे अधिक माहिती घेतली असता भोल्या निकाळजे, राहुल मुळेकर, आणि शेख सलीम शेख शमशुद्दीन यांनी मोंढा येथील संदीप ट्रेडिंग कंपनी या मसाल्याच्या दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी प्रतिकार करून दुकान बंद केल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. नोव्हेंबर मध्ये बडी सडक येथे एका व्यापार्‍याच्या स्कुटीला लटकवलेली पैशाची बॅग हिसकावून पोबारा केला होता आणि यामध्ये अडीच लाख रुपये चोरीला गेले होते .जानेवारीमध्ये घरून मोंढ्याकडे पैशाची बॅग घेऊन जात असताना एका व्यापाऱ्याला वरकड हॉस्पिटल समोर लुटून तीन लाख रुपयांची बॅग लंपास केली होती. मोती मस्जिद जवळ कापड दुकानदाराला त्याच्या घराजवळ डोळ्यात मिरची पूड टाकून पैशाची बॅग लांबून बावीस हजार रुपये पळविले होते. अशा विविध गुन्ह्यांमध्ये वरील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button