Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

आरोग्य विभागाच्या डायलिसिस टेक्निशियन च्या मुलाखती अचानक रद्द

  जालना-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्ह्यातील रिक्त असलेल्या विविध पदांसाठी आज दि.13 रोजी मुलाखती घेण्यात आल्या.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या दालनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी या मुलाखती घेतल्या. समुपदेशक ,लेखापाल, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आणि डायलिसिस टेक्निशियन या पदांसाठीच्या आज मुलाखती होत्या. दरम्यान डायलिसिस टेक्निशियन या पदासाठीच्या उमेदवारांना 10 मे रोजी मुलाखतीसाठी बोलावले होते मात्र त्या अचानक रद्द केल्याचा संदेश या उमेदवारांना दिला गेला आणि त्या रद्द झालेल्या मुलाखती आज शुक्रवार दिनांक 13 मे रोजी पुन्हा घेण्यात येणार असल्याचा संदेश संबंधित उमेदवारांना दिला गेला. जिल्हा मुख्यालयातील दोन पदांसाठी या मुलाखती होत्या आणि एकूण अकरा उमेदवार पात्र ठरले होते. या सर्व उमेदवारांना आज मुलाखतीसाठी बोलावले आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या नाहीत .त्यामुळे गोंधळून गेलेल्या या उमेदवारांना शेवटी रिकाम्या हाताने परत जावे लागले. विशेष म्हणजे बाहेरगावाहून आलेले काही उमेदवार रात्रीपासूनच मिळेल ती व्यवस्था करून जालन्यात ठाण मांडून होते. आज आलेल्या एकूण अकरा उमेदवारांपैकी 9 उमेदवार इथे मुलाखतीसाठी हजर असतानाही उमेदवारच आले नसल्यामुळे या मुलाखती रद्द केल्या ची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे. दरम्यान या अकरा उमेदवारांपैकी अमोल धस, ज्ञानेश्वर गोरे, लखन कोंड्याल, श्रद्धा पवार, विवेक बनायात ,अहिल्या चव्हाण, पवन राऊत, हे जालन्याचे उमेदवार आहेत. आणि ते इथे हजर होते. राहुल आवारे औरंगाबाद, ज्ञानेश्वर कवडे नांदेड हे बाहेरगावाहून आलेले उमेदवार आहेत आणि अन्य दोन उमेदवार गैरहजर होते.

दरम्यान या उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार एका राजकीय पुढाऱ्याचा साबळे नावाचा कार्यकर्ता जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनातून बाहेर आला . त्याने बाहेर येऊन सर्वांना या मुलाखती रद्द झाल्याचे सांगितले. तसेच या तरुणाने आपण त्या नेत्याचा पी. ए. असल्याचे सांगितले. त्यानंतरही या उमेदवारांनी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना बोलू दिले नाही असा आरोप या उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे नाविलाजाने हे सर्व उमेदवार साडेसहा वाजता सामान्य रुग्णालयाच्या परिसरातून बाहेर पडले. त्यामुळे डायलिसिस डायलिसिस टेक्निशियन या पदाच्या मुलाखतीमध्ये” दाल मे काला” असल्याची भावना या सर्व उमेदवारांची झाले आहे ,आणि आमचे जर खोटे वाटत असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे दरम्यान या उमेदवारांना पुन्हा मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली आहे.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button