Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

चार कोटींच्या खंडणीसाठी विद्यार्थ्याचे अपहरण; पाच तासात पोलिसांनी लावला शोध

जालना- तब्बल 4 कोटीच्या खंडणी साठी 16 वर्षाच्या मुलाचे अपहरण, करण्यात आले होते मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे लगेच  फिरवून पाच तासांमध्येच आरोपीला अटक केले आहे. या विद्यार्थ्याला रोज शाळेत ने-आण करणाऱ्या त्याच्या चालकाला आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.


जालना शहरात एका व्यावसायिकाच्या दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण करून तब्बल 4 कोटीची खंडणी मागितली होती, या प्रकरणी पोलिसांना तातडीने सूत्र हलवून अवघ्या 5 तासात या मुलाला शोधलं आहे.,शहरातील व्यावसायिक महावीर गादिया यांचा 16 वर्ष वयाचा मुलगा स्वयम् हा 10 वी ची परीक्षा देण्यासाठी पोद्दार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला,मात्र साडेबारा वाजता परीक्षा संपल्यानंतरही तो घरी परत आला नाही, म्हणून पालकांनी चालकाच्या च्या मोबाईल संपर्क साधला  असता अज्ञात अपहरणकर्त्यांनी मुलगा हवा असल्यास चार कोटीं रुपये आणून देण्याची मागणी केली, यावेळी पोलिसांनी जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करून चालकाचा मोबाईल ट्रेस केला असता सदर मुलगा अंबड रोडवरील शहापूर जवळ चालकासह आढळून आला, या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असून पोलीस इतर अपहरणकर्त्याचा या प्रकरणात शोध घेत आहेत.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button