Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

कडब्याच्या चालत्या ट्रकला आग जीवित हानी नाही

जालना- मंठा येथून जालना शहरात येणाऱ्या कडब्याच्या चालत्या ट्रकला आज दुपारी एक वाजेच्या सुमारास आग लागली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.

दुपारी एक वाजेच्या सुमारास जालना शहराकडे ट्रक क्रमांक एम एच 29 11 65 हा कडबा घेऊन येत होता, दरम्यान जालना शहराजवळ असलेल्या चौधरी नगर जवळील पेट्रोल पंपासमोर अचानक या कडब्याच्या ट्रकलाआग लागली असल्याचे या ट्रकचे चालक कुंदन राजपूत यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तात्काळ ट्रक थांबवून अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळातच जालना नगरपालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि सुमारे चाळीस मिनिटाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. भर दुपारची वेळ जवळच पेट्रोल पंप आणि या वाहनांमधून कडब्याच्या उडणार्‍या ठिणग्या मुळे थोडावेळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते .मात्र योग्यवेळी अग्निशमन दलाचे बंब पोहोचल्याने आग आटोक्यात आली. दरम्यान किती आर्थिक नुकसान झाले हे मात्र कळू शकले नाही. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह अब्दुल बाशीद, नागेश घुगे, सादिक आली, किशोर सगट, नितेश ढाकणे, सुरेश आडे, तायडे, अशोक वाघमारे यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button