सख्ख्या भावाच्या मदतीने चालकाने केले विद्यार्थ्याचे अपहरण
जालना- शहरातील व्यवसायिक महावीर गादिया यांचा दहावीत शिकणारा मुलगा स्वयम् महावीर गादिया याचे काल दि.18 रोजी चार कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास करत असताना अपहरण करता विद्यार्थी स्वयम् आणि त्यांच्या चार चाकी वाहनाचे चालक अर्जुन घाडगे या दोघांनाही अंबड तालुक्यातील शहापूर येथून पोलिसांना सुखरूप ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस घेत होते आणि यामध्ये अक्षय घाडगे याचा सख्खा भाऊ आणि त्याचे इतर दोन नातेवाईक यांनी एकत्र येऊन स्वयम् चे चार कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे कबूल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा तपास पूर्ण केला आहे.
तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे स्वयम् महावीर गादिया हा विद्यार्थी काल 10 वी ची परीक्षा देऊन घरी येणे अपेक्षित असताना तो घरी आलाच नाही.त्यामुळे घरच्यांनी तो ज्या वाहनातून घरी येत होता त्या वाहनचालकाला फोन लावले असतात चार कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.
त्यानंतर धावपळ सुरू झाली पोलिसांना ही माहिती दिली. दरम्यानच्या काळात गादिया यांनी खंडणी देण्याचे कबूल केल्यामुळे खंडणीखोर वेगवेगळी ठिकाणी बदलत होता आणि ज्यावेळी पोलिस आपल्या मागावर आहेत हे लक्षात आले त्यावेळेस त्याने शहापूर जवळ अन्य दोघांना सोडून देऊन स्वयम गादिया आणि स्वतः चालक अक्षय घाडगे शहापूर ला थांबले आणि पोलिसांनी जाऊन त्यांना ताब्यात घेतले.
स्वयमला सुरक्षितपणे त्याच्या वडीलाकडे सुपूर्द केले, मात्र तपास अर्धवट राहिला होता. याप्रकरणी चालक अक्षय घाडगे रा. बारसवाडा तालुका अंबड त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अक्षय घाडगे चा सख्खा भाऊ अर्जुन अंकुश घाडगे आणि त्याचा एक नातेवाईक संदीप आसाराम दरेकर वय 26, राहणार वाल्हा तालुका बदनापुर व अन्य एक जण अशा 4 जणांनी, 4 कोटी रुपयांसाठी अपहरण केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान चालक अक्षय घाडगे हा महावीर गादिया यांच्या दुकानातील रोजची उलाढाल पाहून लाखोंचा रक्कम व्यवसायातून येत असल्याची माहिती त्याच्या साथीदारांना देत होता आणि त्या अनुषंगाने आठ दिवसांपूर्वीच या सर्वांनीच या व्यवसायाच्या ठिकाणची उलाढालीची खात्री करून घेतली होती. त्यानुसार काल दिनांक 18 रोजी स्वयम् त्याची दहावीची परीक्षा देऊन घरी परत येणे अपेक्षित असताना चालक अक्षय घाडगे याने त्याचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केले आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com