बापरे..अंबड आणि मंठा तालुक्यात एकही नोंदणीकृत डॉक्टर नाही.जिल्ह्यात103 बोगस डॉक्टर,

जालना-राज्याचे आरोग्य मंत्री असलेल्या राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद या अंतर्गत (शहरी भाग सोडून ग्रामीण भागामध्ये) असलेल्या आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना, मी नाराज होईल” अशा शब्दात कान उघडणी केल्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे आणि या आरोग्य यंत्रणेमधील अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर यायला लागला आहे .जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी अधिकृत रित्या गोळा केलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यामध्ये 103 अनाधिकृत व्यक्ती डॉक्टर म्हणून व्यवसाय करीत आहेत तर त्याहीपेक्षा मोठा कळस म्हणजे मंठा आणि अंबड या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही अधिकृत नोंदणी केलेल्या वैद्यकीय व्यवसायिकाची नोंद जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नाही. हे मी म्हणत नाही तर त्यांनी दिलेली आकडेवारी सांगत आहे.
जालना शहरात गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात केंद्र उघडकीस आल्यानंतर आरोग्य यंत्रणा जागी झाली आहे आणि आता ती तपास मोहीम सुरू झाली आहे. त्यानुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची तालुका निहाय संख्या पुढील प्रमाणे(शहर वगळून) जालना 27, बदनापूर 31, अंबड 0 ,घनसांगी 81, परतूर 9 ,मंठा 0, भोकरदन 30, अशा एकूण 267 नोंदणीकृत व्यावसायिकांची संख्या आहे.
वैद्यकीय व्यावसायिक आहेत मात्र त्यांची नोंदणी नसलेल्या व्यावसायिकांची संख्या पुढील प्रमाणे जालना 7, बदनापूर 0, अंबड 65 , घनसावंगी4, परतुर 30, मंठा 46, भोकरदन 1, एकूण 166, व्यावसायिकांनी आपली नोंदणी केलेली नाही तर जालना जिल्ह्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणारे परंतु ज्यांना डॉक्टर ही पदवी मिळालेली नाही आशा बोगस डॉक्टरांची संख्या जालना तालुक्यात 25, बदनापूर मध्ये 10, अंबड मध्ये 6,घनसांवगी 9, परतुर 8, मंठा 4, भोकरदन 17, एकूण 103 एवढी संख्या आहे.
नोंदणीकृत- नोंदणीकृत म्हणजे असे व्यवसायिक त्यांच्या पाटीवर बी. ए. एम. एस. आणि बी. एच. एम. एस. लिहिलं आहे आणि ते तोच व्यवसाय करीत आहेत.
नोंदणीकृत नसलेले- ज्यांच्याकडे बी. ए. एम. एस. पदवी आहे मात्र ते या पदवी नुसार उपचार न करता दुसऱ्याच पदवीच्या औषधोपचाराचा रुग्णांसाठी वापर करीत आहेत असे डॉक्टर.
अनाधिकृत डॉक्टर- ज्यांच्याकडे पदवी आहे ते त्या पदवी नुसार तपासणी करू शकतात. परंतु औषध गोळ्या देणे चिठ्ठी लिहून देणे असा दुसऱ्या पदवीचा उपयोग ते करू शकत नाहीत . थोडक्यात या पदवीधारकांना रक्तदाब तपासणी यासारखे वरच्यावर तपासणीचे अधिकार आहेत मात्र ते सलाईन लावणे, इंजेक्शन देणे, अशा प्रकारचा औषधोपचार करतात असे अनाधिकृत डॉक्टर.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com