आज सावलीनेही सोडली होती आपली संगत
जालना- असं म्हणतात की अडचणीच्या काळात सावलीही आपली संगत सोडते, हो खरच आहे! अडचणीचा काळात असो अथवा नसो, वर्षातून दोन दिवस तर सावली देखील आपले साथ सोडते. हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे. त्या दोन दिवसांपैकी आज दिनांक 19 मे एक दिवस आहे .ज्या दिवशी सावलीने आपली साथ सोडली होती ,आणि हा अनुभव येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला.
गुरुवार दिनांक 19 मे रोजी जालना शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात शून्य सावली चा दिवस आहे… शून्य सावली म्हणजे काय? तर आपणा सर्वांना माहित असेल की आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरताना साडे तेवीस अंशाने एकीकडे झुकलेली आहे. त्यामुळे उन्हाळा,हिवाळा आणि पावसाळा हे अतिशय सुंदर चमत्कारिक ॠतूचक्र निसर्गात निर्माण झाले आहेत. सूर्याचा पृथ्वीवरील आकाशातून दिसणारा भासमान मार्ग हा याच मुळे बदलता आहे आपण असे म्हणतो की सूर्य दररोज पूर्वेला उगवतो आणि दुपारी बरोबर बारा वाजता बरोबर आपल्या डोक्यावर येतो ..पण मित्रांनो हे काही खरे नाही..मग काय खरे आहे ? तर सूर्य हा वर्षात फक्त दोन वेळेस ते काही मिनिटापुरताच आपल्या बरोबर डोक्यावर येतो आणि तो दिवस हा” शून्य सावली” चा दिवस असतो .आपण जालन्यात राहतो ..आपले जालना हे विषुववृत्तापासून 2,201.5 किलोमीटर अंतरावर उत्तर गोलार्धात आहे व कर्कवृत्तापासून विषुववृत्ताच्या म्हणजे दक्षिण गोलार्धाच्या दिशेत 399.94 किलोमीटर अंतरावर आहे जालन्याचा अक्षांश 19.83 आणि रेखांश 75.88 आहे. सूर्य विषुववृत्तावर असतो तो 22 मार्च व 21 सप्टेंबर हे दोन दिवस 22 मार्च पासून उत्तर गोलार्धात कर्कवृत्ताच्या दिशेत त्याच्या प्रवासात 19 मे रोजी तो दुपारी 12 वाजून 23 मिनीट यावेळेस जालन्यात बरोबर आपल्या डोक्यावर म्हणजे 90 अंशांवर येतो त्याचा परिणाम सावली शून्य अवस्थेत जाते 21 जून दरम्यान सूर्य कर्कवृत्तावर पोचतो आणि त्याचा मकर वृत्तावर जाण्याचा परतीचा प्रवास सुरू होतो याच प्रवासात 24 जुलै रोजी पुन्हा एकदा तो जालन्यातील आकाशात बरोबर 12 :33 वाजता 90 अंशावर येतो. हा दिवस देखील “शून्य सावली” चा दिवस आहे.
या माहितीवरून आपणास सूर्याचा आकाशातील भासमान मार्ग व भासमान भ्रमण सहज लक्षात येईल शून्य सावली चा जो क्षण आहे तो आपण सहज निरीक्षणातून पाहू शकतो .
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com