चोरट्यांनी केली निवांत घरफोडी आणि पळविला 41 लाख रुपयांचा मुद्देमाल
जालना- जालना शहरातील रुक्मिणी गार्डन परिसरात असलेल्या मगरे बंधूंच्या घरी चोरी करून चोरट्यांनी सुमारे 41 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
सुरेश मगरे आणि रमेश मगरे हे दोन बंधू नातेवाईकांच्या विवाहानिमित्त दिनांक 20 ते 22 मे दरम्यान बाहेरगावी गेले होते. याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 41 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे .चोरटे ज्या ठिकाणाहून या घरांमध्ये आलेत ते ठिकाण सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे.
सुरुवातीला एक चोरटा आला त्याने घराची पाहणी केली आणि परत जाऊन दुसऱ्या चोरट्याला आत घेऊन आला. अशा नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी करण्यात आलेली आहे.
दरम्यान चोरीला गेलेल्या महत्त्वाच्या दागिन्यांमध्ये पोहे हार 40 ग्राम, दोन लाख रुपये. दोन सोन्याचे तोडे 45 ग्राम, अडीच लाख रुपये .एक पदक, कानातले सेट, अशी एकदानि जिचे वजन 45 ग्रॅम आहे ती अडीच लाख रुपये ,आठ कानातली जोड 50 ग्रॅम वजनाचे अडीच लाख रुपये आणि अन्य काही सोन्या-चांदीचे दागिने या सह नगदी दोन लाख रुपये असा एकूण 41 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. यासंदर्भात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com