मध्यप्रदेश मॉडेलचे अनुकरण करण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चाचे लाक्षणिक उपोषण
![](https://edtvjalna.com/wp-content/uploads/2022/05/IMG_20220523_143452-780x470.jpg)
जालना- स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाला आरक्षण देण्यासाठी मध्यप्रदेश मॉडेलचे अनुकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने आज एक दिवस लाक्षणिक उपोषण सुरू आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे उपोषण करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 73 आणि 74 व्या घटना दुरुस्ती अन्वये देण्यातआलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या ,बीसीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने इम्पीरियल डेटा व तीन कसोट्या यांचे पालन करेपर्यंत स्थगिती दिलेली आहे.
प्रमुख मागणी मध्ये इंपिरियल डेटाचे मध्यप्रदेश मॉडेलचे अनुकरण करावे अशी मागणी आहे .या मागणीमुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याचा रस्ता मोकळा होईल असेही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान आज एक दिवसासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या या लाक्षणिक उपोषणामध्ये भारतीय जनता पक्षाचे ओबीसी चे पदाधिकारी अशोक पांगारकर ,धनु काबलिये, अतिक खान, कपिल दहेकर, यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या उपोषणामध्ये सहभाग नोंदविला आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com