खुर्चीला चिटकलेला कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा -रिपब्लिकन सेना
जालना- गेल्या अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने पुढाऱ्यांचा दबाव आणून खुर्चीला चिटकलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे .
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पंधरा वीस वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद अंतर्गत त्यांच्या आधिपत्याखाली येणाऱ्या इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या नाहीत .ज्यांच्या बदल्या केल्या आहेत ते नेत्यांचे कार्यकर्ते आहेत .त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना धाकदपटशाही करून, आर्थिक प्रलोभने दाखवून आपली खुर्ची सोडायला तयार नाहीत, त्याही पुढे जाऊन अधिकाऱ्याने बदली केलीच तर पुन्हा काही ना काही कारणे सांगून ते प्रतिनियुक्तीवर याच खुर्चीला येऊन चीटकतात. त्यांच्या बदल्या होत नसल्यामुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षांपासून खुर्चीला चिटकून बसलेल्या सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या तालुक्याबाहेर कराव्यात अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर आणि दिनेश आदमाने यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अरुण मस्के ,कांताबाई बोरडे, भिमराज खरात, दिनेश वाहुळे, कैलास उघडे यांची उपस्थिती होती.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com