विजेच्या झटक्याने बालकाचा मृत्यू
जालना -जुन्याजालन्यातील राहुल नगर भागामध्ये असलेल्या सूर्यकांत सर्जेराव मस्के या 12 वर्ष वयाच्या बालकाचा विजेच्या झटक्याने दुर्दैवी अंत झाला. जुन्या जालन्यातील रेल्वे पटरी च्या बाजूलाच असलेल्या राहुल नगर भागामध्ये दिनांक 23 रोजी विजेच्या काही खांबा मध्ये वीजप्रवाह उतरला होता. आणि त्यासंदर्भात वीज वितरण कंपनीकडे तक्रारही करण्यात आली होती. कंपनीने दोन कर्मचारी पाठवले त्यांनी थातूरमातूर तपासणी केली आणि निघूनही गेले. 24 तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या खांबांमध्ये पुन्हा विद्युतप्रवाह उतरला आणि या विजेच्या झटक्याने सुर्यकांत सर्जेराव मस्के बालकाचा मृत्यू झाला. बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मजहर सय्यद आणि त्यांचे सहकारी कैलास जावळे यांनी राहुल नगर भागाकडे धाव घेतली. दिनांक 24 च्या मध्यरात्रीपर्यंत त्यांनी वीज कर्मचाऱ्यांसह या परिसरात पुन्हा पाहणी केली आणि वीज वितरण कंपनीच्या रोहित्रा ला कुलूप ठोकले. दरम्यान याप्रकरणी कलीम जालना पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com