ऐकावं ते नवलच! तिसऱ्या मजल्यावर चढली गाय; दोन दिवसानंतर खाली उतरवण्यात यश
जालना- बांधकाम सुरु असलेल्या एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर गाय चढली आणि तिला खाली उतरवणे मध्ये दुसऱ्या दिवशी यश आलं. या प्रकाराला विचित्र प्रकार म्हणावे की आश्चर्यकारक! हा एक प्रश्नच आहे.
त्याचे झाले असे की काल रविवारी दुपारी दोन- तीन वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात राहत असलेल्या रमाबाई नगर मधील मार्कस लाजरस झांबरे यांची गाय विद्युत कॉलनी मध्ये असताना तिच्या मागे एक कठाळ्या लागला. त्यामुळे गाय घाबरली आणि बांधकाम सुरू असलेल्या या घरांमध्ये घुसली. पायऱ्या चढून ती दुसर्या मजल्यापर्यंत गेली. या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे सर्वच भिंती बांधणे बाकी आहे. त्यामुळे तिला कदाचित खाली येण्यासाठी रस्ता दिसला नसेल आणि ती पुन्हा वर चढली ती तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवर.
गाय कोणाचे आहे हा शोध घेतल्यानंतर मार्कस झांबरे यांची गाय असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांच्या परिवाराने या घरावरून गाईला खाली हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र ती खाली आली नाही. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. काल सहा वाजता पाच- सहा जवान येऊन देखील गेले मात्र त्यांना यश आले नाही.
त्यामुळे गाईची मालकीण श्रीमती झांबरे यांनी गाईला गच्चीवरच चारा पाणी टाकले. आज पुन्हा दुपारी तीन वाजेच्या सुमारास गाईला खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि यावेळी मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन खाटिक बांधवांना सोबत आणले. कारण त्यांना जनावरांना कसे बांधायचे याविषयीची माहिती असते. त्यांची मदत घेण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान, काही नागरिक आणि या खाटीक बांधवांच्या मदतीने तीन तासाच्या परिश्रमानंतर या गाईला बांधून तिसऱ्या मजल्यावरून खाली आणण्यात आले.
खाली आणताच गायचे बांधलेले पाय सोडले आणि त्यावेळी गायीचे धूम ठोकली ती पुन्हा दिसलीच नाही.या गाईला सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये अग्निशमन दलाचे जवान संदीप दराडे, निलेश ढाकणे, किशोर सगट, सादिक अली, विठ्ठल कांबळे, संतोष काळे, नागेश घुगे ,अशोक वाघमारे, यांचा समावेश होता .त्यासोबत मोहसिन पटेल आणि आलमगीर हे दोन खाटीक बांधव तर अमित कुलकर्णी ,बाबा पठाण, राहुल ससाने, मुबारक पठाण ,सचिन घुले, या नागरिकांनीदेखील गाईला खाली उतरविण्यात मध्ये मदत केली.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com