सर्वच गावाला घरकुल द्या: लोंढेवाडीकरांची मागणी
जालना -जालना तालुक्यातील लोंढेवाडी या गावात शंभर ते दीडशे ग्रामस्थांना घरकुल मंजूर झालेले आहे ,मात्र केवळ 19 घरे या घरकुलापासून अपात्र ठरविण्यात आली आहेत. या 19 घरांसह पात्र यादीतून वगळण्यात आलेल्या अन्य एक अशा एकूण वीस गावकर्यांना घरकूल देण्यात यावे अशी मागणी इतर गावकऱ्यांनी केली आहे.
जालन्याचे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की लोंढेवाडी येथील घरकुलाची ऑनलाइन सर्व प्रक्रिया पार पडली आहे आणि त्यामध्ये केवळ 20 गावकर्यांना घरकुलातून वगळण्यात आले आहे. या घरांना घरकुल देण्यासाठी कोणत्याही गावकऱ्यांचा विरोध नाही त्यामुळे त्यांना घरकुल देऊन लोंढेवाडी ला 100% घरकुल योजना राबवावी अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देण्यासाठी ह. भ. प. विष्णु महाराज बारड, भागवत बाबुराव साबळे, विठ्ठल अंबादास कड, एकनाथ लक्ष्मण घोलप, शंभू भीमराव उंबरे, यांची उपस्थिती होती.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com