Jalna Districtजालना जिल्हा

श्रमदानासाठी जालनेकर पहाटेच कुंडलिका- सीना नदीपात्रात

जालना- समस्त महाजन ट्रस्ट आणि कुंडलिका -सीना नदी पुनरुज्जीवन फाउंडेशन च्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाला जालनेकारांनी भरभरून दाद दिली, आणि आज पहाटे साडे सहा वाजताच नदीपात्रामध्ये उतरून श्रमदान करून वृक्षारोपणही केले.

आज जागतिक पर्यावरण दिन. या दिनाच्या पूर्वतयारीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून समस्त महाजन ट्रस्ट आणि कुंडलिका- सीना पुनरुज्जीवन फाउंडेशन परिश्रम घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना शहरातून वाहणाऱ्या नदी पात्राची स्वच्छता करून गाळही काढण्यात आला. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नदीपात्रामध्ये स्वच्छता करून काठावर वृक्षारोपण केले. यासाठी जालना शहरातील स्वायत्त संस्था, व्यापारी, अधिकारी, यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पर्यावरण तज्ञ पाशा पटेल हे देखील आज आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी बांबू लागवडीसाठी चे महत्त्व समजावून सांगितले. यालाच प्रतिसाद देत जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड देखील या उपक्रमासाठी झटत आहेत. आणि ते स्वतःहून वृक्षारोपण करून दुसऱ्यांना ही प्रेरित करीत आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, समस्त महाजन ट्रस्त च्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई, सुनील रायठठा, अक्षय शिंदे,डॉ. सुयोग कुलकर्णी, प्रतिभा श्रीपत, अनया अग्रवाल, यांच्यासह अनेक पदाधिकारी हा उपक्रम राबविण्यासाठी झटत आहेत. विनोद जैतमहाल हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गेल्या महिनाभरापासून विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी आणि श्रमदानासाठी जालनेकरांमध्ये जनजागृती करीत आहेत.

आज नदी पात्राच्या दोन्ही काठावर विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. त्यामध्ये प्राधान्याने बांबूची लागवड करण्यात आली आहे.या कार्यक्रमाला डॉ, अनिल कुलकर्णी, राजेश खिस्ते, ओमप्रकाश चितळकर डॉ. शर्मा, प्राचार्य रमेश अग्रवाल, डॉ.पंडित वासरे. ज्योती आडेकर, विद्या जाधव. आधी सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.——–

 

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button