जालनेरांच्या माळरानावरील वृक्षारोपनाला पावसाचा प्रतिसाद
जालना- पावसाळा येणार, पावसाळा येणार, म्हणत गेल्या दोन महिन्यांपासून जालनेकर पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुंडलिका -सीना नदी पात्राची स्वच्छता करून काठावरती वृक्षारोपण केले आणि या वृक्षांच्या रक्षणासाठी वरुणराजा ही प्रसन्न झाला आणि आज धो-धो बरसला.
सद्य परिस्थिती तरी ही झाडे जगली आहेत. नदीकाठी झालेल्या वृक्षारोपणानंतर जालनेकरांनी ध्यास घेतला तो माळराणावर वृक्षारोपनाचा. रविवारचे मुहूर्त साधत सकाळी सात वाजल्यापासूनच जालनेकर शहरापासून जवळच असलेल्या पारसी टेकडीकडे रवाना होऊ लागले. उद्योगपती सुनील रायठठ्ठा आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड हे स्वतः देखील या माळरानावर हजर झाले. जालनेकर तर उत्साही होतेच ते देखील वृक्षारोपणासाठी तिथे हजर झाले. सकाळी झालेल्या वृक्षारोपनानंतर दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावून जणूकाही या झाडांचे रक्षणच केले आहे. त्याच सोबत कुंडलिका नदीचे स्वच्छ केलेले पात्र आणि यामधून संथगतीने वाहत जाणारे पाणी पाहिल्यानंतर जालनेकरांनी घेतलेल्या प्रामाणिक कष्टाला फळ मिळाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com