Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाचा बुधवारी जल आक्रोश मोर्चा

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जालना नगरपालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला ,मात्र त्याचा योग्य वापर झाला नाही. म्हणून आजही जालनेकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातीलच एक समस्या म्हणजे पाणीपुरवठा !आणि या समस्येला घेऊनच बुधवार दिनांक 15 रोजी जालना नगरपालिकेवर “जल आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा भोकरदन चे आमदार संतोष दानवे यांनी आज दिली.

दरम्यान शहरातील विकास कामांना भाजपाने मोठ्या प्रमाणात निधी दिला होता, आणि जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या जालन्याच्या नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा ने सोबत जालना शहरातील विकास कामे केली आणि दोघांनीही एक दुसऱ्याचे कौतुक केले. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने जालना नगरपालिकेचा विरोध करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंधरा तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान भाजपाला देखील आता जिल्ह्यात हळूहळू सुरुंग लागायला सुरुवात झाली आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांचा एक गट तयार झाला आहे आणि कालच भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांनी गांधीचमन वर भाजपाच्या नेतृत्वाच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केले आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी डावल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करून याला सर्वस्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप डॉ.श्रीमंत मिसाळ यांनी केला होता.

या आंदोलनात जे पदाधिकारी काल बसले होते, सहभागी झाले होते हेच पदाधिकारी आज आ. संतोष दानवे यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांचे ही दुटप्पी धोरण उघडे पडले आहे.

आ. दानवे यांनी पंकजा मुंडे यांच्या बद्दल आपल्याला आदर आहे आणि पक्ष त्यांना विधान परिषदेपेक्षाही चांगली संधी देईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button